कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत भाजपने आपली कंबर कसली आहे. याच धर्तीवर पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमध्ये सोमवारी भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांची सभा होती. दिलीप घोष यांची सभा सुरु होण्यापूर्वीच दुर्गापूरमध्ये दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली.
भाजप कार्यकर्त्यांनी टीएमसीमधून भाजपात प्रवेश घेण्यासाठी आलेल्या लोकांचा विरोध केला. यामुळे भाजपाच्या दोन गटांमध्ये वाद सुरु जाला. या दरम्यान, स्टेजवर चढून भापज कार्यकर्त्यांनी एकमेकांवर हल्ला चढवला. भाजप कार्यकर्त्यांच्यामते, आम्ही सर्व कार्यकर्ते याचा विरोध करतो. कारण, जर टीएमसीतून आलेली लोक भाजपात प्रवेश घेतील, तर आम्ही याविरोधात जाऊ. यापूर्वी शनिवारी गृह मंत्री आणि भाजप नेते अमित साह यांच्या उपस्थितीत शुभेंदु अधिकारी यांच्यासह 11 खासदार आणि आमदारांनी भाजपात प्रवेश केला. शुभेंदु अधिकारी यांनी नुकतंच टीएमसीचा राजीनामा दिला होता.
शुभेंदु अधिकारी यांच्याशिवाय, टीएमसी आमदार वनश्री माइती, आमदार दिपाली विश्वास, आमदार शीलभद्र दत्ता, आमदार सैकत पांजा आमदार विश्वजीत कुंडू यांचा समावेश होता. त्याशिवाय, नागराकाटा येथून टीएमसी आमदार सुकरा मुंडा, काँग्रेस आमदार सुदीप मुखर्जी, आमदार अशोक डींडा, खासदार सुनील मंडल, माजी खासदार दशरथ तिर्की, माजी मंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देखील भाजपात प्रवेश घेतला.
Read Also :
अयोध्या विवाद : अशी असणार अयोध्येची पाच एकर जागेवरील मशीद; डिझाईन झालं प्रसिद्ध
आमदार फोडण्याची ताकद अजित पवार यांच्यात नाही, चंद्रकांत पाटलांची टीका
‘पाकिस्तानाहून अधिक मुस्लीम भारतात, अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा’