भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेलया वादाच्या पार्शवभूमीवर चीनला आणखी एक झटका बसला आहे . यावर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये VIVO स्पॉन्सर नसणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या मीटिंगमध्ये चीनी स्पॉन्सर ठेवण्यावरुन चौफेर टीका होत होती. त्यामुळे VIVO स्पॉन्सरला विरोध होत होता. आता VIVO आयपीएलचा स्पॉन्सर नसणार अशी माहिती समोर आली आहे.
इंडियन प्रीमियर लीगमधील 13वा सीझन 53 दिवस चालणार आहे. यादरम्यान 60 सामने खेळवण्यात येणार आहेत. संपूर्ण टुर्नामेंटच्या फॉरमॅटमध्ये कोणताही बदलाव करण्यात येणार नाही. 13व्या सीझनमध्ये 10 डबल हॅडर सामने खेळवले जाणार आहेत. सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार 7 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. तर डबल हॅडर सामन्यांच्या दिवशी सामना 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु करण्यात येणार आहे.
आयपीएल संचालक समितीने रविवारी टुर्नामेंटच्या प्रमुख स्पॉन्सर म्हणून चीनी कंपन्यासोबत राहण्याच्या निर्णय घेतला होता. भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. यामुळेच चीनी कंपन्याचा जोरदार विरोध सुरु आहे.याच पार्शवभूमीवर आता VIVO आयपीएलचा स्पॉन्सर नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.