IMPIMP

US Elections 2020 : अमेरिकेचा पुढील अध्यक्ष कोण होणार? आज फैसला  

वॉशिंग्टन : 
 
अमेरिकन अध्यक्षपदासाठी आज (03 नोव्हेंबर) मतदान होणार आहे. हा निवडणुकीचा शेवटचा टप्पा असून अमेरिकेचा पुढील अध्यक्ष कोण होणार? याचा फैसला होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार जो बायडेनयांची बाजू अधिक भक्कम असून ही निवडणूक अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  हरू शकतात. डोनाल्ड ट्रम्प ही निवडणूक हरले तर 1992 नंतर पहिल्यांदाच असं होईल की, विद्यमान राष्ट्राध्यक्ष दुसऱ्यांदा निवडून आले नाहीत
 
आक्रस्ताळे डोनाल्ड ट्रम्प हवे की, शांत-संयत ज्यो बायडन यांच्या हाती सत्तासूत्रे सोपवावी याचा अंतिम निर्णय आज, मंगळवारी अमेरिकी मतदार घेतील. दरम्यान, लोकप्रियतेत बायडन यांनी ट्रम्प यांना पिछाडीवर टाकल्याचे चित्र विविध कल चाचण्यांतून निदर्शनास येत आहे. त्यामुळे अध्यक्षीय निवडणुकीत कोण बाजी मारतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

अभूतपूर्व अशा कोरोना कहराने जगातील एकमेव महासत्ता असलेली अमेरिका त्रस्त असताना अध्यक्षीय निवडणुकीचा कार्यक्रम होत आहे. कोरोना संसर्गामुळे अनेकांनी मुदतीच्या आत मतदान केले आहे, तर अनेकांनी टपाली मतदानाला पसंती दिली आहे. आतापर्यंत ९ कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अध्यक्षपदी कोणाची निवड झाली, हे मतदानानंतर लगेचच समजू शकणार नाही 
Read Also :