नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर वाढला असून, नव्या रुग्णांचे प्रमाण देखील कमी झाली आहे. काही दिवसांपुर्वी दिल्लीत कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला होता. मात्र आता रुग्ण बरे होत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील कोरोना स्थितीविषयी माहिती देताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत दिवसाला अमेरिकेपेक्षाही जास्त कोविड चाचण्या केल्याचा दावा केला आहे.
केजरीवाल म्हणाले की, आता करोनाची तिसरी लाट ओसरली असून, दिल्लीत दिवसाला अमेरिकेपेक्षाही जास्त कोविड चाचण्या करण्यात आल्या दिल्लीकरांच्या सहकार्यांमुळे सरकारने परिणामकारक आणि यशस्वीपणे तिसऱ्या लाटेवर मात केली आहे.
आम्ही दररोज 90 हजार चाचण्या करत आहोत. ही संख्या देशातीलच नाही, तर अमेरिकेपेक्षाही जास्त आहे. 10 लाख लोकसंख्येमागे 4500 चाचण्या केल्या जात आहेत. देशाच्या आणि जगाच्या तुलनेत दिल्लीत दररोज सर्वाधिक चाचण्या केल्या जात आहेत. इतकंच नाही तर चाचण्यांमध्ये अमेरिकेचाही क्रमांक आमच्यानंतर येतो, असा दावा त्यांनी केला आहे.