नागपुर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनात संघर्ष होत असल्याचंही चित्र आहे. तुकाराम मुंढे हे आपल्या धडक कारवाईसाठी ओळखले जातात. कोरोना रुग्णांची भेट घेतल्यानंतरही तुकाराम मुंढे यांनी प्रशासनाला ताबोडतोब आदेश दिले.
कोरोना थैमानाच्या पार्श्वभूमीवर नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नुकतीच शासकीय मेडिकल रुग्णालयात व इंदिरा गांधी शासकीय कोविड रुग्णालयात भेट दिली. नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी ३००० चा आकडा पार केला आहे. नागपुरात काल आणखी ६८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर नागपूरच्या कामठी तालुक्यात पुन्हा १३ रुग्ण आले पॉझिटिव्ह आढळले आहेत.
तुकाराम मुंढे यांनी स्वतः PPE KIT घालून आयसोलेशन वार्डात जावून रुग्णांशी संवाद साधला. येथील परिस्थितीचा आढावा घेत संबंधितांना सूचना व दिशानिर्देश दिले. यावेळी स्वतः तुकाराम मुंढे यांच्यासह डॉक्टर अविनाश गावंडे आणि डॉ.फैजल उपस्थित होते. शहरात कोरोना संक्रमण वेग वाढत असताना आयुक्त तुकाराम मुंढे आक्रमक झाले आहेत. मुंढे यांनी शहरातील रस्त्यांवर उतरत कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली. तसंच गांधीबाग झोनमध्ये कोविडबाबतच्या दिशानिर्देशाचे पालन न करणारऱ्यांना समज दिल्याचं पाहायला मिळालं.