पश्चिम बंगाल: सध्या देशात जागतिक महामारीने हैराण करून सोडले आहे. देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना महामारीमुळे परिस्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. अश्यातच देशात पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ पुद्दुचेरी या राज्यांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. तामिळनाडू ,पश्चिम बंगाल, केरळ या राज्यांत भारतीय जनता पक्षाने प्रादेशिक पक्षांकडून सपाटून मार खाल्ला आहे. पुद्दुचेरी आणि आसाम मधील सत्ता टिकविण्यास भारतीय जनता पक्षाला यश मिळाले आहे. भारतीय जनता पक्षाला मात्र झालेले पराभव जिव्हारी लागले आहेत. Mamata Banerjee on West Bengal violence
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक पार पडल्यानंतर आता मोठ्या प्रमाणावर दंगली उसळण्यास सुरुवात झालेली आहे. निवडणुकी संपल्यानंतर सुरु झालेल्या हिंसाचारावरून भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस हे एकमेकांच्या समोर परत आले आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. निकालानंतर झालेल्या संघर्षावर आता प्रथमच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी West Bengal Chief Minister and Trinamool Congress President Mamata Banerjee यांनी आपले मौन सोडले आहे.
No such incident can be tolerated. There is more disturbance in places where BJP has won. BJP is circulating about fake incidents through old videos. My appeal to all political parties is to stop this. You all have done a lot during elections. Bengal is a place of unity: WB CM pic.twitter.com/PYyii2xtJl
— ANI (@ANI) May 5, 2021
No such incident can be tolerated. There is more disturbance in places where BJP has won. BJP is circulating about fake incidents through old videos. My appeal to all political parties is to stop this. You all have done a lot during elections. Bengal is a place of unity: WB CM Mamata Banarji.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. जुने पुराणे व्हिडिओ दाखवत भारतीय जनता पक्ष हिंसाचाराच्या घटनांचा बनाव करतोय असे त्यांनी म्हटले आहे. बंगाल ही एकतेचे प्रतीक असलेली भूमी आहे. अश्या पद्धतीने होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांचे समर्थन अजिबात केले जाणार नाही. जिथं जिथं भारतीय जनता पक्ष जिंकला आहे तिथं तिथं या पेक्षाही अधिक गोंधळ माजलेला आहे. माझी पश्चिम बंगाल मधील सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की कृपा करून त्यांनी हे असले प्रकार थांबवावेत असे ममता यांनी स्पष्ट केले आहे. “I urge all political parties in West Bengal to please stop this,” she said.