मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी ईडीने नोटीस बजावल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. संजय राऊत यांनी तर नोटीस मिळालीच नसल्याचा दावा केला आहे. पण, ही ईडीची नोटीस ही 55 लाखांच्या कर्जापोटी बजावण्यात आल्याचे समोर आले आहे.
PMC बँक घोटाळा प्रकरणी HDIL च्या वाधवा बंधुवर कारवाई करण्यात आली होती. गोरेगाव येथील एका पुर्नविकास प्रकल्पात HDIL ची आर्थिक अनियमितता दिसून आली होती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास हा EOW करत होती. त्यानंतर हे प्रकरण आता ईडकडे गेलं.
वाधवा बंधू यांच्या चौकशीतून प्रवीण राऊत यांचं नाव पुढे आले होते. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आहे. प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकाउंटमधून वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये देण्यात आली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच हे पैसे का घेतले गेले? याची माहिती ईडीला हवी आहे.