बुलढाणा : नांदेडमधील लोडाचे अपक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे , अमरावतीमधील मोर्चीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आणि सोलापुरचे अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांच्यावर राऊतांनी गंभीर आरोप केले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष आमदार घोडेबाजारात विकले गेल्याने पराभवाचा सामाना करावा लागला असं संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊतांचे सर्व आरोप संजय मामा शिंदे यांनी फेटाळून लावले तर अपक्ष आमदार नरेंद्र भोंडे यांनी संजय राऊतांना याबाबत समर्थन दिले आहे.
“नुुपुर शर्मा प्रकरणात मोदी, शहा, योगींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा” ;अमोल मिटकरी
सकाळी जेव्हा टिव्ही बघितला, तेव्हा राज्यसभेचा निकाल बघून मला धक्काच बसला. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील सहा आमदार फुटल्यामुळे संजय पवार यांचा पराभव झाला आहे. यामध्ये कोण फुटलं. का फुटलं. यावर पक्षश्रेष्ठी चर्चा करेल आणि आज ना उद्या ते लक्षात येईलच. असं म्हणत नरेंद्र भोंडेंकर यांनी राऊतांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
नुपुर शर्मा यांच्याविरोधात राज्यात, देशात मुस्लिम बांधव आक्रमक; अनेक ठिकाणी दगडफेक
एका निवडणुकीत यश मिळालं म्हणजे सगळं काही मिळवलं नाही. आगामी काळात येत्या 20 जून रोजी निवडणुक होत आहे. त्या निवडणुकीत महाविकास आघाडी शंभर टक्के विजयी होईल. याची मला खात्री वाटते. तसेच या निवडणुकीत कमी प्रयत्न झाले असले तर पुढच्या निवडणुकीत जास्त प्रयत्न करू असंही ते नरेंद्र भोंडेंकर म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या बाजूने राष्ट्रवादी, काॅंग्रेस बच्चू कडू, गडाख, यड्रावकर आणि इतरांची सर्व मते आम्हाला मिळाली आहेत. फक्त घोडेबाजारात जे उभे होते त्यांचे सहा मते पडली नाही. तरीही आम्हाला 33 मते मिळाली असून हा आमचा विजय आहे. त्याचबरोबर हरभऱ्याच्या झाडावर चढू नका, हरभरे काही अपक्षांनी खाल्ले आहेत. तुम्ही हरभऱ्याच्या झाडावर चढू नका असा इशाराही राऊतांनी भाजपला दिला.
Read also:
- “घोडेबाजारातील असतो तर अगोदरच विकलो गेलो असतो”; राऊतांना संजयमामांचं जोरदार प्रत्युत्तर
- निवडणूक राज्यसभेची अन् चर्चा पुणे जिल्ह्यातील ‘या’ चार आमदारांची !
- “केंद्रीय यंत्रणा तुमच्या कामी आल्या, 2024 ला हा हिशोब चुकता करू”; राष्ट्रवादीचा भाजपला इशारा
- “चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरचा पैलवानच वाढदिवसानिमित्ताने भेट दिला”; देवेंद्र फडणवीस
- “लक्ष्मण जगताप यांनी दाखविलेली आश्वासक मुद्रा कधीच विसरू शकणार नाही”; देवेंद्र फडणवीस