पुणे : गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या मुक्ता टिळक यांना मतदानासाठी आज विधान भवनात स्ट्रेचरवर बसून विधिमंडळात आणण्यात आलं. त्याचबरोबर लक्ष्मण जगताप यांना देखील रूग्णवाहिकेतून मतदानासाठी विधानभवनात आणण्यात आलं. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष्मण जगताप यांच्यासाठी विधानभवानाच्या पायऱ्यांवर आलेत.
मतदानावेळी मोठा घोळ; जितेंद्र आव्हाड, कांदे, यशोमती ठाकुर यांचं मत बाद ठरण्याची भाजपची मागणी
भाजप पक्ष हा विचार आणि ध्येयासाठी सर्वोच्च समर्पण आहे. प्रकृतीच्या गंभीर तक्रारी असताना सुद्धा मतदानाला आलेले आमचे मित्र लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचे आभार मानावे तरी कोणत्या शब्दात? शब्द अपुरे पडतील. अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
“हवेमध्ये उडणारे भाजपचे विमान संध्याकाळी जमिनीवर येईल”
लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोघांनीही आज राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. विधान भवन, मुंबई येथे त्यांचे स्वागत केले, तेव्हा त्यांचा तोच उत्साह होता, जो भाजपाच्या नियमित कार्यक्रमांमध्ये असतो. लक्ष्मण जगताप यांनी दाखविलेली आश्वासक मुद्रा मी कधीच विसरू शकणार नाही. दोघांचेही अगदी मनापासून आभार असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
एक मत लाखो मोलाचं; भाजपच्या आमदार मतदानासाठी स्ट्रेचरवरून विधिमंडळात दाखल
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीत कोल्हापुरात मोठी चुरस बघायला मिळणार आहे, कारण भाजपकडून अतिरिक्त उमेदवार म्हणून धनंजय महाडिक तर शिवसेनेकडून संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर भाजपकडून अनिल बोंडे, पियुष गोयल, तर शिवसेनेकडून संजय राऊतांनी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून प्रफुल पटेल, आणि काॅंग्रेसकडून इम्रान प्रतापगढ़ी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा निकाल आज सायंकाळी लागणार आहे.
Read also:
- “नुुपुर शर्मा प्रकरणात मोदी, शहा, योगींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा” ;अमोल मिटकरी
- नुपुर शर्मा यांच्याविरोधात राज्यात, देशात मुस्लिम बांधव आक्रमक; अनेक ठिकाणी दगडफेक
- “ज्यांनी हनुमान चालिसाचा अपमान केला, त्याचा विनाश होणार”; रवी राणांचं मुख्यमंत्र्यांवर पुन्हा टिकास्त्र
- “आजपासून भाजपची उलटी गिनती सुरू”; नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल
- ..म्हणून एमआयएमनं आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला; रोहित पवारांनी सांगितलं खरं कारण