मुंबई : राज्यात 24 वर्षानंतर प्रथमच राज्यसभेची निवडणुक ही बिनविरोध होत असून त्याचा आज सांयकाळी निकाल लागणार आहे. सकाळी 9 वाजेपासून मतदान सुरू झालं असून आतापर्यंत सर्वपक्षीय 238 आमदारांनी मतदान केलं आहे. सत्ताधारी पक्षांसह, विरोधी पक्ष देखील आपलाच उमेदवार जिंकण्याचा दावा करत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेच आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
व्हिलचेअरवरून भाजपचे दोन आमदार विधानभवनात येणार ; राजकीय घडामोडींना वेग
महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे मिळून वाटचाल करत आहोत. फक्त खंत एका गोष्टीची आहे की महाराष्टाची एक पंरपरा होती. एक संस्कृती होती. अशा प्रकारची निवडणुक बिनविरोध व्हावी अशी परंपरा असताना भाजपने त्याला फाटा दिला आहे. वेगळ्या पद्धतीने ताकद दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. असं आपण करत असू, तर ही गोष्ट महाराष्ट्रासाठी , आपल्या देशासाठी घातक आहे. त्यांना काही गोष्टींचा गर्व असू शकतो. काही गोष्टी दिल्लीवरूनही आल्या असतील, असंही ते म्हणाले.
भाजप बऱ्याच गोष्टींचा दावा करत आहे. राजकीय दृष्टीने ज्या गोष्टी त्यांना फायद्याच्या आहेत. त्याचाच दावा ते करतात. जिथे राजकारण येतं तिथे ते अॅक्टिव्ह होतात. भाजपने राजकीय हितासाठी त्यांची खेळी खेळलेली आहे. ज्या पक्षांना वाटतं की संविधान टिकलं पाहिजे, ते पत्र एकत्र येऊ शकतात. त्याच कारणाने हे पक्ष एकत्र आले आहेत. त्याच आधारावर एमआयएमनं महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. संविधान टिकलं पाहिजे, या हेतुने कुणी पाठिंबा देत असेल तर त्याचं स्वागत करायला हवं. असंही ते म्हणाले.
“उद्या भाजपला पळता भुई थोडी होणार, तिन पटांची थोबाड बंद होण्यासाठी काही तास शिल्लक”
दरम्यान, एमआयएम पक्षातील दोन आमदारांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देत असल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं. त्यानंतर शिवसेनेवर भाजप आणि मनसेकडून जोरदार टिका करण्यात आली. तत्पर्वी आज राज्यसभेच्या 6 उमेदवारांसाठी मतदान झालं असून त्याचा निकाल आज सायंकाळी लागणार आहे.
Read also:
- मतदानावेळी मोठा घोळ; जितेंद्र आव्हाड, कांदे, यशोमती ठाकुर यांचं मत बाद ठरण्याची भाजपची मागणी
- “हवेमध्ये उडणारे भाजपचे विमान संध्याकाळी जमिनीवर येईल”
- “निजामाची औलाद एमआयएमची मदत घेऊन शिवसेनेचं नकली, ढोंगी हिंदुत्व उघड पडलं”
- एक मत लाखो मोलाचं; भाजपच्या आमदार मतदानासाठी स्ट्रेचरवरून विधिमंडळात दाखल
- राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू; दीड तासात 143 आमदारांनी केलं मतदान