मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान होत आहे. राज्यसभेसाठी येत्या 10 तारखेला मतदान होत असून एकुण 6 जागांसाठी 7 उमेदवार मैदानात उभे राहिले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांना एक एक मत निवडणुक जिंकण्यासाठी महत्वाचं ठरणार आहे. यातच आता महाविकास आघाडीतील मोठा धक्का बसला आहे. यावर आता भाजप नेते किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की, “गेल्या 40 वर्षात..;”
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी न्यायालयात राज्यसभेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी जामीन अर्ज सादर केला होता. मात्र गुरूवारी यावर सुनावणी झाल्यानंतर त्यांना मतदानासाठी जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांना दोन मतांवर पाणी फेरावं लागणार आहे.
“ना हिंदुत्व, ना हुंकार, फक्त लावंगीच्या फुसक्या माळा”; मनसेने मुख्यमंत्र्यांना डिवचलं
हे तर होणारच होतं. न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या गालावर बारावी थप्पट मारली आहे. माफिया सरकारच्या माफिया सरदारांना असं वाटतंय की, गुंडांसारखं राज्य करायचं. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेला हे मान्य नाही. उद्धव ठाकरे यांनी ज्याने दाऊदच्या एजंटला मंत्रिमंडळात ठेवलं आणि महाराष्ट्राच्या जनतेला मी ठेवणार असं सांगितलं. आता पाहा काय होतं ते. आता कळेल त्यांना. अशी माफियागिरी करणाऱ्या सरकारला न्यायालयच अशाच पद्धतीने अनेक धडे शिकवणार, शेवटचा धडा हा महाराष्ट्राचे साडेबारा कोटी जनता शिकवणार आहे. असंही किरीट सोमय्या म्हणाले.
“भाजपवाले चॉकलेट दाखवून पुढेही तुमचा वापर करतील”
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात डॉ.मेधा किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शिवरी न्यायालयाने संजय राऊतांना समन्स बजावले असून ४ जूलै रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी सांगितले आहे. युवक प्रतिष्ठान मेधा सोमय्या यांचा १०० कोटीचा शौचालय घोटाळा याबाबत संजय राऊत यांनी आरोप केले होते.
Read also:
- “उद्या भाजपला पळता भुई थोडी होणार, तिन पटांची थोबाड बंद होण्यासाठी काही तास शिल्लक”
- इडीने केला आघाडीचा घात; निवडणुकीसाठी नवाब-देशमुखांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
- पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली पाहिजे होती, याचा परिणाम होईल; छगन भुजबळ यांचं सुचक वक्तव्य
- “ज्यांना घोडेबाजार होईल, असं वाटतं त्यांच्या खिशात चणे, फुटाणे असतील”
- “शिवसेनेमुळेच ‘उमा खापरे’ यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी”; दिपाली सय्यद