मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीकरीता भाजपने आपल्या उमेदवारांची नावे घोषीत केली आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसने देखील विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोतांना मात्र यावेळी भाजपने डावलेले आहे. त्यावरून आता त्यांच्यावर काॅंग्रेसकडून मिश्कील टिप्पण केली आहे.
देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह ;संजय राऊत म्हणाले..;
विधान परिषदेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी युवक कांग्रेस कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, सदाभाऊ खोत नाराज होऊ नका. डोळ्यासमोर माधव भंडारी यांचा चेहरा आणा दुःख दूर होईल . सवय लावून घ्या. भाजपावाले चॉकलेट दाखवून तुमचा वापर पुढेही करतील. त्यामळे खचून न जाता आज थोडं थंड प्या आणि कामाला लागा.
“तर आता सगळ्या स्पर्धा परीक्षा गाजवणाऱ्या मुली दिसल्या असत्या का ?”
भाजपकडून प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय आणि प्रा. राम शिंदे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच काॅंग्रेसकडून भाई जगताप, आणि चंद्रकांत हंडोरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून सचिन आहिर आणि आमशा पाडवी यांना संधी देण्यात येणार आहे. जयंत पाटील यांनी देखील आज राष्ट्रवादी काॅंग्रेसकडील उमेदवारांची नावे घोषित केली आहे.
पुण्यात महापालिकेत आघाडीची युती; अजित पवारांनी दिले संकेत
दरम्यान, भाजपमधून राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर रामराजे नाईक निंबाळकर यांना देखील पुन्हा देखील संधी देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवारी विजयी होऊन महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहतील असा विश्वास देखील जंयत पाटील व्यक्त केला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. त्यानंतर २० जूनला विधान परिषदेच्या १० जागासांठी मतदान होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील एका गटाची मागणी विधान परिषद मिळावी अशी आहे.
सदाभाऊ खोत नाराज होऊ नका …डोळ्यासमोर माधव भंडारी यांचा चेहरा आणा दुःख दूर होईल ..सवय लावून घ्या ..भाजपा वाले चॉकलेट दाखवून तुमचा वापर पुढेही करतील…त्यामळे खचून न जाता आज थोडं थंड प्या आणि कामाला लागा.
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) June 8, 2022
Read also:
- “चहापेक्षा किटली गरम”; त्यावरून भाजपचा उद्धव ठाकरे, राऊतांना टोला
- अखेर नाथाभाऊंचा राजकीय वनवास संपला; राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर उमेदवारी जाहीर
- फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचा मापच काढला; म्हणाले, त्यांनी दुसर्यांना ‘अच्छे दिन’..;”
- विधान परिषदेसाठी पिंपरी-चिंचवडमधून कोणाला मिळणार संधी? राष्ट्रवादीच्या इच्छुकांची जोरदार ‘फिल्डिंग’
- “लाचार संजय राऊत यांना ‘स्मृतीभ्रंश’ झालाय”; ‘त्या’ व्यक्तव्यावरून मनसेचा राऊतांना टोला