पुणे : सभेला जमलेली ही विराट गर्दी म्हणजे समुद्राची उसळलेली लाट आहे. या लाटेचा तडाखा भाजपला बसला तर पाणी प्यायला उठणार नाही, अशा शब्दात काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर तोफ डागली. तसेच यासभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील भाजपवर कडाडून टिका केली. आता याचाच धागा पकडत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर खोचक टिप्पणी केली आहे.
“तर आता सगळ्या स्पर्धा परीक्षा गाजवणाऱ्या मुली दिसल्या असत्या का ?”
औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्धव ठाकरे यांची काल राजकीय सभा पार पडली. त्यावेळी शिवसेनेच्या अनेक नेत्यांची जोरदार भाषणं झालीत. मराठवाड्याला शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे. मराठवाड्याने औरंगजेबाला या मातीत गाडले. हीच शिवसेना निजामाच्या छातीवर पाय देऊन सत्तेत आली आहे. असं संजय राऊत म्हणाले.
पुण्यात महापालिकेत आघाडीची युती; अजित पवारांनी दिले संकेत
त्याचबरोबर शिवसेनेची उसळलेली समुद्राची लाट आहे. ही आंधी आहे. तुफान आहे. ही उसळलेली लाट महाराष्ट्राला नव्हे तर दिल्लीतील तख्तालाही हादरे दिल्याशिवाय राहणार नाही. ही गर्दी ही शक्ती एवढच सांगते, आमच्या नादाला लागू नका, अशा इशारा राऊतांनी भाजपला दिला. त्यावर चहापेक्षा किटली गरम अशी शाब्दिक टिप्पणी चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर केली आहे.
“आम्ही शहरी बाबू, आमचा साखरेशी संबंध हा चहात टाकण्यापुरताच”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
औरंगाबाद येथे बोलताना उद्धव ठाकरे यांनी पाणी प्रश्नावरून भाजपवर हल्लाबोल केला. पहिल्यांदा पाणी प्रश्नावर बोलणार कुठेही फसवेगिरी नाही. हा प्रश्न बिकट होता. आता सुधारणा झाली की नाही? जूनी योजना हातात दंडा घ्या आणि पहिले संभाजीनगरला पाणी द्या. जुन्या योजनेसाठी समांतर योजनेला पैसे देणार. कोरोनात वर्ष गेली. पण आता किंमती वाढल्या खर्च वाढणार पण शासनाने याची जबाबरदारी घेतली. कंत्राटदार अडून बसला तर सरळ तुरूंगात टाका, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
Read also:
- अखेर नाथाभाऊंचा राजकीय वनवास संपला; राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर उमेदवारी जाहीर
- फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचा मापच काढला; म्हणाले, त्यांनी दुसर्यांना ‘अच्छे दिन’..;”
- विधान परिषदेसाठी पिंपरी-चिंचवडमधून कोणाला मिळणार संधी? राष्ट्रवादीच्या इच्छुकांची जोरदार ‘फिल्डिंग’
- “लाचार संजय राऊत यांना ‘स्मृतीभ्रंश’ झालाय”; ‘त्या’ व्यक्तव्यावरून मनसेचा राऊतांना टोला
- देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह ;संजय राऊत म्हणाले..;