पुणे : आगामी काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी पुण्यात महापालिकेची राष्ट्रवादी काॅंग्रेसची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी काल पिंपरी चिंचवड येथील काही कार्यकर्त्यांशी भेटी घेतल्या. त्यावेळी त्यांनी महापालिकेत तिन्ही पक्षांची युती होण्याचे संकेत दिलेत.
आघाडीची दोन मत आणखी कमी झालीत; राज्यसभा निवडणुकीत २ आमदार तटस्थ राहणार
कोल्हापुर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला यश आले आणि भाजपचा उमेदवाराला पराभावाचा सामना करावा लागला. त्यामुळेच पुण्यात देखील राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना आणि काॅंग्रेस एकत्रित निवडणुका लढविणार असल्याची माहिती समोर येत आहे. काल अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना यासंदर्भात इतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे.
पुण्यात महापालिका निवडणुकीची कमान राष्ट्रवादीची अजित पवारांकडे तर भाजपकडे कोण ?
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मित्र पक्षांचे काय म्हणण आहे बघा व अंदाज घ्या. असे त्यांनी सांगितले आहे. काॅंग्रेसच्या स्थानिक नेत्यांशींही चर्चा होईल. काॅंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेप्रमाणे संपर्क साधल्यास अजित पवार यांच्या सुचनेनुसार आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, असं राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितलं आहे.
“मरेन, तुरूंगात जाईन पण स्वाभिमान कधीच सोडणार नाही”; हर्षवर्धन जाधवांचा दानवेंना इशारा
दरम्यान, पुण्यात सध्या भाजपची सत्ता असून पुढील निवडणुकीत भाजपला ही सत्ता राखण्यात मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण पुण्यात तिकीटबाजीवरून भाजपमध्ये गिरीश बापट आणि चंद्रकांत पाटील असे दोन गट पडण्याची शक्यता आहे. कारण चंद्रकांत पाटलांना नेहमी बाहेरचेच म्हटले जात आहे. त्यामुळे भाजपला सत्ता राखण्यास जड जाणार आहे.
Read also:
- “आम्ही शहरी बाबू, आमचा साखरेशी संबंध हा चहात टाकण्यापुरताच”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- काश्मीर मोदींच्या हातात काळजी करू नका; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
- “गोपीचंद पडळकर सारख्या नेत्याला भाजपने आवरालं पाहिजे”; रोहित पवार
- “त्यावेळी इडीचे अधिकारी माझ्यासमोर हात जोडून उभे होते”; शरद पवारांनी सांगितला तो किस्सा
- “बृजभूषण सिंह कुणी मॅनेज करेल अशी ती व्यक्ती नाही”; शरद पवार