पुणे : आगामी काही काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी राष्ट्रवादीने पुण्यात तर शिवसेनेने मुंबईत आपल्या सोयीनुसार प्रभाग रचना केल्याचा आरोप काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. मात्र तरी देखील राष्ट्रवादी काॅंग्रेसला महापालिकेतील सत्ता भाजपकडून हस्तगत करण्यात मोठी कसरत लागणार आहे.
“पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच”; सुप्रिया सुळेंनंतर आता धनंजय मुंडे यांचाही दावा
भाजपच्या ताब्यात असलेली पुण्यातील महानगरपालिका राष्ट्रवादीकडे खेसून आणण्यासाठी या निवडणुकीची सुत्रे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिली आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून अजित पवार यांनी पुण्यातील तसेच पिंपरी चिंचवड मधील कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा धडाका लावला आहे. त्यावरून राष्ट्रवादी जोरदार तयारी करतानाचे चित्र दिसत आहेत.
संजय राऊत व त्यांच्या सेनेने मग तुमची धूनी भांडी करायची का ?
अशातच आता सत्ता राखण्यासाठी भाजपदेखील कार्यकर्त्यांची फौज पुण्यात उभी कऱण्याची शक्यता आहे. मात्र यामध्ये त्यांना मोठी अडचण ठरणार आहे. मागील निवडणुकीत गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील सत्ता भाजपने ताब्यात घेतली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांचं पुण्यात आगमन झालं. त्यानंतर पुण्यातील तसेच राज्यातील सगळी सुत्रे चंद्रकांत पाटलांच्या ताब्यात आली. यामुळे पुण्यात भाजपचे दोन गट पडलेत.
“चित्रपट बघून मोदी अश्रू गाळतात, पण काश्मिरी पंडितांच्या हत्त्यांवर ते बोलत नाही”
दरम्यान, कोल्हापुरकर चंद्रकांत पाटलांना पुण्यातून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर बाहेरून आलेले अशी टिका स्वपक्षीय तसेच विरोधी पक्षांकडून करण्यात आली. यामुळे पुण्यात बापट आणि पाटील असे दोन कार्यकर्त्यांचे गट पडलेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत तिकिटावरून या गटबाजीतून नाराजी उफळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीची कमाल भाजप चंद्रकांत पाटलांकडे की गिरीश बापटांकडे सोपवणार ते पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- “मरेन, तुरूंगात जाईन पण स्वाभिमान कधीच सोडणार नाही”; हर्षवर्धन जाधवांचा दानवेंना इशारा
- “मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर जातीपातीचं राजकारण सुरू झालं”; प्रणिती शिंदे
- ” राज्याचे मुख्यमंत्र्यांना मुंबई म्हणजे महाराष्ट्र वाटतंय”; फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं
- “गडकरी साहेबांच्या सहकार्याने विदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू होईल”; शरद पवार
- “राज्यात तुर्तास मास्क सक्ती नाही पण..;” आरोग्य मंत्र्यांनी दिल्या महत्वाच्या सुचना