मुंबई : राज्यात राज्यसभेसाठी 10 जून रोजी मतदान होत असून त्यानंतर लगेच विधान परिषदेकरीता निवडणुक होत आहे. एकुण 10 जागासाठी होऊ घातलेली विधान परिषदेची निवडणुक राज्यसभेसाठीच रंगतदार होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना , आणि काॅंग्रेसने उमेदवार जाही केले असून आज राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील उमेदवारांची नावे घोषित केली.
पुण्यात महापालिकेत आघाडीची युती; अजित पवारांनी दिले संकेत
भाजपकडून प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय आणि प्रा. राम शिंदे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच काॅंग्रेसकडून भाई जगताप, आणि चंद्रकांत हंडोरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून सचिन आहिर आणि आमशा पाडवी यांना संधी देण्यात येणार आहे. जयंत पाटील यांनी देखील आज राष्ट्रवादी काॅंग्रेसकडील उमेदवारांची नावे घोषित केली आहे.
“आम्ही शहरी बाबू, आमचा साखरेशी संबंध हा चहात टाकण्यापुरताच”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
भाजपमधून राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर रामराजे नाईक निंबाळकर यांना देखील पुन्हा देखील संधी देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवारी विजयी होऊन महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहतील असा विश्वास देखील जंयत पाटील व्यक्त केला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. त्यानंतर २० जूनला विधान परिषदेच्या १० जागासांठी मतदान होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील एका गटाची मागणी विधान परिषद मिळावी अशी आहे.
“बृजभूषण सिंह कुणी मॅनेज करेल अशी ती व्यक्ती नाही”; शरद पवार
दरम्यान, ९ जून रोजी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्यामुळे राष्ट्रवादी कोणाला संधी देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले. पिंपरी-चिंचवडमधून माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, माजी महापौर संजोग वाघेरे यांच्यासह माजी महापौर मंगला कदम, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी आपआपल्या परीने पक्षश्रेष्ठींकडे तगादा लावला आहे.
Read also:
- फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचा मापच काढला; म्हणाले, त्यांनी दुसर्यांना ‘अच्छे दिन’..;”
- विधान परिषदेसाठी पिंपरी-चिंचवडमधून कोणाला मिळणार संधी? राष्ट्रवादीच्या इच्छुकांची जोरदार ‘फिल्डिंग’
- “लाचार संजय राऊत यांना ‘स्मृतीभ्रंश’ झालाय”; ‘त्या’ व्यक्तव्यावरून मनसेचा राऊतांना टोला
- देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह ;संजय राऊत म्हणाले..;
- “तर आता सगळ्या स्पर्धा परीक्षा गाजवणाऱ्या मुली दिसल्या असत्या का ?”