पुणे : शिवसेना खासदार संजय राऊतांना पुण्यातील एका कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सध्याचे सरकार हे बाळासाहेबाच्या स्वप्नातील सरकार आहे, असं उत्तर दिलं होतं. त्यावर आता मनसे नेते गजानन काळे यांनी संजय राऊत यांचा जोरदार चिमटा काढला आहे.
“गोपीचंद पडळकर सारख्या नेत्याला भाजपने आवरालं पाहिजे”; रोहित पवार
संजय राऊत म्हणतात आताचे सरकार हे बाळासाहेबाच्या स्वप्नातील सरकार आहे. बाळासाहेब असते तर हे सरकार बनवायचा प्रस्ताव आणणाऱ्यांच्या पेकाटात लाथ घातली असती. हिंदु द्वेष करणाऱ्या काँग्रेस,राष्ट्रवादीबद्दल बाळासाहेबांनी अनेकदा आसूड ओढले आहेत. लाचार संजय राऊत यांना”स्मृतीभ्रंश”झालाय. असं त्यांनी म्हटलं आहे.
“त्यावेळी इडीचे अधिकारी माझ्यासमोर हात जोडून उभे होते”; शरद पवारांनी सांगितला तो किस्सा
शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे अनेकदा व्यासपीठावर एकत्र दिसलेले आहेत. आता जे सरकार आलेलं आहे. ते बाळासाहेबांचं स्वप्न होतं. बाळासाहेबांची भूमिका होती. आज अनेकांकडून गैरसमज निर्माण केला जात आहे. त्यांना शिवसेनेचा विचार आणि बाळासाहेबांची भूमिका माहिती आहे. असं विचारलेल्या प्रश्नांवर संजय राऊत यांनी उत्तर दिलं होतं.
“बृजभूषण सिंह कुणी मॅनेज करेल अशी ती व्यक्ती नाही”; शरद पवार
दरम्यान, काल एका कार्यक्रमात संजय राऊत, राष्ट्रवादी काॅंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि काॅंग्रेस नेता कैन्हाया कुमार देखील उपस्थित होता.
Read also:
- देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह ;संजय राऊत म्हणाले..;
- “तर आता सगळ्या स्पर्धा परीक्षा गाजवणाऱ्या मुली दिसल्या असत्या का ?”
- पुण्यात महापालिकेत आघाडीची युती; अजित पवारांनी दिले संकेत
- “आम्ही शहरी बाबू, आमचा साखरेशी संबंध हा चहात टाकण्यापुरताच”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- काश्मीर मोदींच्या हातात काळजी करू नका; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला