मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दुसऱ्यांदा कोरोना चाचणी सकारात्मक आली असून त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी यासंदर्भात अधिक माहिती आज ट्विटवरून दिली आहे. त्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
“त्यावेळी इडीचे अधिकारी माझ्यासमोर हात जोडून उभे होते”; शरद पवारांनी सांगितला तो किस्सा
माझी कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. मी गृह विलगीकरणात आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोना संबंधित औषध आणि उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात जे कुणी आले असाल, त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांनी काळजी घ्यावी, असं त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
“बृजभूषण सिंह कुणी मॅनेज करेल अशी ती व्यक्ती नाही”; शरद पवार
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील राजकीय मनभेद विसरून फडणवीसांना बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस लवकर बरे व्हा. आपल्या प्रकृतीस लवकरात लवकर आरोम मिळो. आणि खाली जय महाराष्ट्र असंही त्यांनी ट्विटवर लिहिलं आहे.
आघाडीची दोन मत आणखी कमी झालीत; राज्यसभा निवडणुकीत २ आमदार तटस्थ राहणार
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून राज्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्य मंत्र्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे आवश्यक असल्याच्या सुचना दिल्या आहेत. तुर्तास मास्क सक्ती नाही, परंतु ज्या ज्याठिकाणी मास्क घालणे गरजेचे आहे. त्याठिकाणी नागरिकांनी मास्क घालणे अनिवार्य असं त्यांनी म्हटलं आहे.
I have tested #COVID19 positive and in home isolation.
Taking medication & treatment as per the doctor’s advice.
Those who have come in contact with me are advised to get Covid tests done.
Take care everyone !— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 5, 2022
Read also:
- “तर आता सगळ्या स्पर्धा परीक्षा गाजवणाऱ्या मुली दिसल्या असत्या का ?”
- पुण्यात महापालिकेत आघाडीची युती; अजित पवारांनी दिले संकेत
- “आम्ही शहरी बाबू, आमचा साखरेशी संबंध हा चहात टाकण्यापुरताच”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- काश्मीर मोदींच्या हातात काळजी करू नका; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
- “गोपीचंद पडळकर सारख्या नेत्याला भाजपने आवरालं पाहिजे”; रोहित पवार