नाशिक : पंकजा मुंडे यांना भाजपने पहिल्या क्रमांकावर उतरता आलं असतं. मात्र तसं झाले नाही. एकनाथ खडसे यांच्या बाबतीत तेच झालं होतं. पंकजा मुंडे यांना परत घेतलं जाईल अस वाटत होतं. पंरतु तसं काही झालं नाही. त्याचा परिणाम हा लोकांवर व समाजावरही होईल, असं सुचक वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री छगन भुजबळ यांनी केलं. भाजपने काल विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यावर ते बोलत होते.
“चहापेक्षा किटली गरम”; त्यावरून भाजपचा उद्धव ठाकरे, राऊतांना टोला
विधान परिषद निवडणुकीसाठी येत्या 20 जून रोजी मतदान होत आहे. त्यासाठी राज्यातील राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. संख्याबळानुसार भाजपला 4 तर आघाडीतील प्रत्येक पक्षाला 2 उमेदवार सहज निवडून आणण्याची शक्यता आहे. मात्र या निवडणुकीत भाजपने सदा भाऊ खोत यांना अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली आहे.
अखेर नाथाभाऊंचा राजकीय वनवास संपला; राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर उमेदवारी जाहीर
एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते म्हणाले की, ज्या निष्ठेने गेल्या ४० वर्षात काम केले. त्याहून अधिक ताकदीने आता राष्ट्रवादी पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणार. मला विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिल्याबद्दल पक्षाध्यक्ष आदरणीय पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, प्रदेशाध्यक्ष जयंतराव व सर्व नेत्यांचे विनम्र आभार, असंही ते म्हणाले.
फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचा मापच काढला; म्हणाले, त्यांनी दुसर्यांना ‘अच्छे दिन’..;”
दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकीत सदाभाऊ खोतांची उमेदवारी यावेळी भाजपने नाकारली. भाजपने प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, आणि राम शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच पंकजा मुंडे, विनायक मेटे, आणि माधव भंडारी यांना देखील भाजपने डावलेले असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
Read also:
- “ज्यांना घोडेबाजार होईल, असं वाटतं त्यांच्या खिशात चणे, फुटाणे असतील”
- “शिवसेनेमुळेच ‘उमा खापरे’ यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी”; दिपाली सय्यद
- उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की, “गेल्या 40 वर्षात..;”
- “ना हिंदुत्व, ना हुंकार, फक्त लावंगीच्या फुसक्या माळा”; मनसेने मुख्यमंत्र्यांना डिवचलं
- “भाजपवाले चॉकलेट दाखवून पुढेही तुमचा वापर करतील”