पुणे : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होत असून राज्यातील भाजप आणि महाविकास आघाडीला प्रत्येक आमदारांचं मत महत्वपुर्ण ठरणार आहे. त्यामुळेच भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपपल्या आमदारांना एकत्रित ठेवण्यात आलं आहे. अशातच भाजपच्या पुण्यातील दोन आमदारांना एअर अॅम्बुलन्सने विधानभवनात आणण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
“शिवसेनेमुळेच ‘उमा खापरे’ यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी”; दिपाली सय्यद
पिंपची चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप बऱ्याच दिवसापासून आजारी होते. त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना आता घरी सोडण्यात आले आहेत. तसेच कसबा पेठच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांची देखील तब्येत व्यवस्थित नव्हती. या दोन्ही आमदारांची तब्येत गेल्या काही दिवसापासून अत्यंत नाजूक स्थितीमध्ये असल्याने त्यांनी भाजपच्या कोणत्याही बैठकीला उपस्थिती लावली नाही.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की, “गेल्या 40 वर्षात..;”
मात्र राज्यसभा निवडणुक जिंकण्यासाठी या दोन्ही आमदारांना थेट एअर अॅम्बुलन्सने विधानभनवात आणण्यात येणार आहे. टिळक सध्या मुंबईत आहेत. व्हिलचेअरवरून या दोन्ही नेत्यांना मतदानासाठी विधानभवनात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र आज त्यांचा अहवाल नकारात्मक आल्याने ते आज भाजपच्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
“ना हिंदुत्व, ना हुंकार, फक्त लावंगीच्या फुसक्या माळा”; मनसेने मुख्यमंत्र्यांना डिवचलं
दरम्यान, राज्यसभेच्या एकुण ६ जागांसाठी निवडणुक होत असून भाजपने धनंजय महाडिक आणि शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यामध्ये दोघांमध्ये जोरदार चुरस बघायला मिळणार असून आता या निवडणुकीचं चित्र उद्या स्पष्ट होणार आहे.
Read also:
- “न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या गालावर बारावी थप्पट मारली”; जामीन अर्ज फेटाळ्यानंतर सोमय्यांची प्रतिक्रिया
- “उद्या भाजपला पळता भुई थोडी होणार, तिन पटांची थोबाड बंद होण्यासाठी काही तास शिल्लक”
- इडीने केला आघाडीचा घात; निवडणुकीसाठी नवाब-देशमुखांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
- पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली पाहिजे होती, याचा परिणाम होईल; छगन भुजबळ यांचं सुचक वक्तव्य
- “ज्यांना घोडेबाजार होईल, असं वाटतं त्यांच्या खिशात चणे, फुटाणे असतील”