IMPIMP
Who called in Porsche car accident case? Who brought the pressure Who called in Porsche car accident case? Who brought the pressure

पोर्शे कार अपघात प्रकरणात फोन कोणी केले ? दबाव कोणी आणला ? आव्हाडांचे परखड सवाल, फडणवीसांनी दिलं हे उत्तर

पुणे :  गेल्या काही महिन्यात चर्चेत आलेल्या पोर्शे कार अपघात प्रकरण विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात चांगलंचं गाजलं. या घटनेची संपुर्ण माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. तर पोर्शे कार अपघात प्रकरणात कोणी फोन केले ? कोणी दबाव आणला ? असे परखड सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तर दिलं आहे.

हेही वाचा..“महाराष्ट्राचं राजकारण सहानुभतीवर चालतं, विधानसभेतही चालणार “

विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात जितेंद्र आव्हाड यांनी पोर्शे कार अपघात प्रकरणाच्या मुद्यावर भाष्य केलं. यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आपण स्पष्ट बोलणारे आहेत. या गुन्हा संदर्भात कोणी फोन केले होते ? कोणी दबाव आणला, याची माहिती तुम्ही दिली पाहिजे. त्यावर स्थानिक आमदार त्याठिकाणी गेले होते. त्यांनी त्यांच्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. असं म्हणत कोणीही कोणाला फोन केलेला नाहीय असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा..“तीनवेळा प्रयत्न केला, आता माघार नाही”? रमेश कोंडे भाजपच्या आमदाराची खोची करणार ? 

यासंपुर्ण घटनेची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली आहे. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आले होते. या सर्व बाबी रेकॉर्डवर आणण्यात आल्या आहेत. याप्रकरणात पहिली चार्जशीट दाखल करण्यात आली असून पुरावे गोळा करण्यात आले आहेत. क्रॅश इम्पॅक्ट अॅनालिसिस करण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर विधिसंघर्षग्रस्त बालकाने ब्रेक मारला होता. तेव्हा त्या कारचा वेग हा ११० किमी प्रतितास हा होता. तो बालक कार अत्यंत वेगात चालवत होता. असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

READ ALSO :

हेही वाचा..“हेमंत सोरेन यांच्या १४९ दिवसांच्या लढ्याला आज न्यायाचा मार्ग मिळाला”, शरद पवारांनी एनडीए सरकारकडे केली ‘ही’ मागणी 

हेही वाचा…शेकापच्या जयंत पाटलांना कॉंग्रेस अन् शरद पवार गटाचा पाठिंबा, परंतु ठाकरे गट…? 

हेही वाचा..फडणवीस अन् ठाकरेंचा एकाच लिप्टमधून प्रवास, ठाकरे महायुतीत जाणार का ? 

हेही वाचा..भाजपकडून विधानपरिषदेच्या ०५ जागांसाठी ११ नावांचा विचार..! कुणाला मिळणार संधी ? 

हेही वाचा..भाजपच्या स्थानिक नेत्यांची अजितदादांवर नाराजी, 18 ते 19 आमदार शरद पवारांच्या संपर्कात 

Leave a Reply