IMPIMP
Who will be the Speaker of Lok Sabha, Andhra Pradesh's 'this' woman is hotly debated Who will be the Speaker of Lok Sabha, Andhra Pradesh's 'this' woman is hotly debated

कोण होणार लोकसभेचे अध्यक्ष ? आंध्र प्रदेशच्या ‘या’ महिलेची जोरदार चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमीत कमी वेळेत त्यांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे ७२ सदस्यीय केंद्रीय मंत्रिमंडळ स्थापन केल्यानंतर आता १८ व्या लोकसभा अध्यक्षपदाची निवड करावी लागणार आहे. हे पद आता दक्षिणेतील नेत्याला दिले जाऊ शकते. लोकसभा निवडणुकीत दक्षिणेत मिळालेली जनाधार आणखी मजबूत करण्यासाठी पक्षाचा प्रयत्न असणार आहे. तसेच सध्या सरकारमध्ये पुर्ण बहुमत मिळालं नाही. तर विरोधी पक्ष देखील भक्कम स्थितीत असल्याने लोकसभा अध्यक्षांची निवड देखील तशाच पद्धतीने करण्याच्या हालाचाली सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा..“धनंजय मुंडे, आता सुट्टी नाही हं..! सर्दी, पडसं झालं असं आम्ही ऐकणार नाय”, तटकरेंनी चांगलंच सुनावलं 

मागच्या सरकारच्या काळात भाजपचे खासदार ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षपदाचा कारभार सांभाळला होता. यावेळेस भाजपच्या आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्ष डी. पुरंदेश्वरी यांची निवड लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्याबाबत विचार सुरू आहे. यातच सध्या एनडीएमध्ये चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा देखील सरकारमध्ये समावेश असल्यांने त्यांचा देखील यावेळी विचार घ्यावा लागणार आहे. अशातच पुरंदेश्वरी या आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची पत्नी त्यांच्या बहिण आहेत.

हेही वाचा…“राज्यात शिंदे-ठाकरे विधानसभेला पुन्हा एकत्र येणार” ? शिंदेंच्या नेत्यांनी दिला मोठा दुजोरा 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडू आणि भाजपला एकत्रित आणण्यात पुरंदेश्वरी यांची मोलाची भूमिका राहिली आहे. पुरंदेश्वरी या दिवंगत एन.टी. रामाराव यांच्या कन्या आहेत. तर त्यांची बहिण आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची पत्नी आहे. २०१४ पुर्वी त्या कॉंग्रेसमध्ये होत्या. १५ व्या लोकसभेत त्यांनी कॉंग्रेसतर्फे विशाखापट्टणमचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच १४ व्या लोकसभेत त्या मनुष्यबळ विकास राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या.

READ ALSO :

हेही वाचा..राज्यातील ‘सहा’ मंत्र्यांवर सोपविली विविध खात्याची जबाबदारी, वाचा सविस्तर 

हेही वाचा..राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी मोहोळांकडे सहकार खाते, भाजप नेतृत्वाची महाराष्ट्रात मोठी खेळी 

हेही वाचा…“बारामतीचा दादा आता बदलायला हवा, युगेंद्र पवारांना विधानसभेची उमेदवारी द्या,” शरद पवारांकडे कार्यकर्त्यांची मागणी 

हेही वाचा..पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी तातडीने उपाययोजना करा..! मंत्रीपदाची शपथ अन् पहिल्याच दिवसापासून कामाला सुरुवात 

हेही वाचा…“लोकसभेसारखं विधानसभेच्या जागावाटपाचं गुऱ्हाळ शेवटपर्यंत चालून नका,” भुजबळांनी आधीच सगळं केलं स्पष्ट