गेल्या काही दिवसांपासून आमदार विनायक मेटे हे वारंवार मराठा आरक्षणासंदर्भात पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि वारंवार शासनाला जाब विचारात आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने जी खबरदारी घेणे आवश्यक होते ती घेतलेली नाही. आघाडी सरकार मराठा आरक्षण आणि त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये जी बेफिकिरी दाखवत आहे ती खूप असहनीय असल्याचे मत आमदार विनायक मेटे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या मराठा आरक्षण सुनावणीसाठी आमदार विनायकराव मेटे दिल्लीत दाखल झाले होते दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आरक्षणाबाबत जे करायला हवे ते सरकार करत नाही आणि नको ते करत आहे. अशोक चव्हाण समिती आणि ठाकरे सरकार काहीही करत नाही. मराठा समाजाची ताकद एवढी असताना राज्यातील जाणते राजे अर्थात शरद पवार हे मराठा आरक्षण मुद्द्यामध्ये हस्तक्षेप का करत नाही ? असा प्रश्न राज्यातील मराठा समाजाला पडलेला असल्याचे मत विनायक मेटे यांनी व्यक्त केले आहे.
नेमकं काय म्हणाले विनायक मेटे यावेळी
पवार जस सगळ्या समाजावर लक्ष देतात तस त्यांनी मराठा समाज्यावर सुद्धा द्यावे
शरद पवार यांना प्रशासनाचा इतका अनुभव आहे मग मराठा आरक्षणासाठी ते मार्गर्शन का करत नाहीत ?
संपूर्ण मराठा समाज पवार यांच्यावर प्रेम करतो मग अशा वेळेस ते मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष का करतात ?
शासनाने मराठा आरक्षणासाठी काय नियोजन केले याची माहिती पवार साहेब का घेत नाहीत
अशोक चव्हाण फक्त तयारी केली आहे असं म्हणतात परंतु काय केलय हे सांगत नाहीत.
मुख्यमंत्र्यांनी आणि शरद पवारांनी आम्ही मराठा आरक्षण टिकवू असा शब्द जनतेला द्यावा.
VIDEO