मुंबई : महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री कोण होणार हे आशिष शेलार ठरवणार का? ते भाजपची मराठा महिला मुख्यमंत्री म्हणत आहेत का?, भाजपचे मुख्यमंत्री की महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री?, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री कोण होणार हे आशिष शेलार ठरवणार का?, आम्ही आमचे मुख्यमंत्री केले आहेत, असा पलटवार अनिल परबांनी आशिष शेलारांवर केला.
आशिष शेलार यांना भाजपचा मुख्यमंत्री करायचा असेल तर त्यांना जी स्वप्ने पडली आहेत, त्यावेळी त्यांनी तो करावा. शेलार यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले हे म्हणणं चुकीचे आहे. जो दगड त्यांनी भिरकावला त्याच्या अनेक ठिकऱ्या उडाल्या आहेत, अशी टीकाही अनिल परबांनी केली आहे.
तसेच अनिल परबांना राज्यपाल नियुक्त आमदारांबद्दल विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी विनंती केली आहे. राज्यपालांनी 15 दिवसांत निर्णय घ्यावा, ते 15 दिवस झालेले आहेत. ती विनंती आहे, कायदा नाही. विनंतीचे काय करायचे हे राज्यपालांनी ठरवायचे आहे. पण त्यांनी अजून काही केलेलं नाही. आता महाविकास आघाडीचे नेते एकत्रितपणे पुढे काय करायचे याचा निर्णय घेतील. सगळ्या गोष्टी तपासून पुढचा निर्णय घ्यावा लागेल.
निवडणुका आल्या की छत्र्या उघडायच्या, असा हा पक्ष नाही- अनिल परब
येत्या मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, निवडणुकीला अजून सव्वा वर्ष आहे. सर्व नेते एकत्र बसून निर्णय घेतील. शिवसेना ही निवडणुकीसाठी जन्माला आलेला पक्ष नाही. आमचं काम नेहमीच सुरू असते. निवडणूक असो वा नसो, पक्षप्रमुख नेहमीच आढावा पदाधिकाऱ्यांकडून घेत असतात. तसाच आढावा आता सुरू आहे.
निवडणुका आल्या की छत्र्या उघडायच्या, असा हा पक्ष नाही, 365 दिवस शिवसेनेचे काम सुरू असते. त्यामुळे निवडणुकीची आम्हाला वेगळी तयारी करावी लागत नाही. प्रत्येक पक्षाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे. त्यांनी ती जरूर बघवीत. आम्ही त्यांच्या स्वप्नामध्ये जाणार नाही, ज्या दिवशी स्वप्न भंग होईल त्यादिवशी आम्ही बोलू, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.
Read Also :
मोदी सरकारने ‘सीबीआय’ची पानटपरी केली आहे, काँग्रेसच्या ‘या’ मंत्र्याची टीका
तृणमूल काँग्रेसचे ५ खासदार भाजपप्रवेशाच्या तयारीत, ‘या’ भाजपा खासदाराच्या दाव्याने खळबळ
…म्हणून आमदार रोहित पवारांनी शाळकरी मुलांना धीर देत दिल्या शुभेच्छा
मुख्यमंत्री ठाकरेंना बॉलिवूडची तर आदित्य ठाकरेंना पब,बारची चिंता, आशिष शेलार बरसले…
ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी राजीनामा देऊन ‘क्लार्क’चं काम करावं, ‘या’ भाजप नेत्याची जोरदार टीका