मुंबई : महाराष्ट्रात वाढीव वीज बिलाचा मुद्दा सध्या खूप गाजत आहे. सर्वसामान्य जनतेवर हा आर्थिक भार पडल्याने आता आंदोलनं होत आहेत. यावरुन आता भाजप आणि महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. काल मुंबईत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन केलं होत.
वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर सुरु असलेले आरोप प्रत्यारोप थांबायचं नाव घेत नाहीत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. ‘ऊर्जामंत्र्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्क म्हणून काम करावं, भाजप कार्यकर्ते त्यांना वीज बिलं दाखवतील’, असा खोचक टोला दरेकर यांनी नितीन राऊतांना लगावला आहे.
भाजप नेत्यांनी वीजबिलं घेऊन माझ्या कार्यालयात यावं, सर्वांची मी तपासणी करून देईन, जर वाढीव वीजबिलं नसतील, तर त्यांनी प्रॉमिस करावं, आम्ही सर्व वीजबिलं भरू, असं आव्हानच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल भाजपला दिलं होतं. त्यावर आज प्रवीण दरेकर यांनी राऊतांना खोचक टोला लगावताना मंत्रीपदाचा राजीनामा देत महावितरणमध्ये क्लार्क म्हणून नोकरी करण्याचा सल्ला दिला आहे.
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रवीण दरेकर आज उस्मानाबादमध्ये आहेत. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना दरेकरांनी राऊतांवर जोरदार टीका केलीय. त्याचबरोबर बिलं तपासायला ऊर्जामंत्री काय टीसी आहेत का? असा सवालही दरेकर यांनी केला आहे.
Read Also :
आमदारकीसाठी पाठवलेल्या नावांवर राज्यपाल लवकरच निर्णय घेतील: छगन भुजबळ
कराची स्वीट्स; नितीन नांदगांवकर यांच्यावर संजय निरुपम यांची टीका, म्हणाले..
विरोधकांकडे लक्ष न देता महापालिका निवडणुकिसाठी अधिक जोमाने कामाला लागा -उद्धव ठाकरे
‘हे’ नागपूरला यायला घाबरतात, मग दिल्लीला काय जाणार? ; बावनकुळेंचा सरकारला टोला