मुंबई : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे आजही राज्यात ठिकठिकाणी त्याचे पडसाद उमटताना दिसून येतात. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली असताना आता छत्रपती उदयनराजेंनीही यात उडी घेतली आहे. मी राजकारण करत नाही, पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच अशी भावना भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी मांडली आहे.
यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले की, मी कधीही राजकारण केले नाही. केवळ मराठा समाज नाही तर कोणत्याही समाजावार अन्याय होत असेल तर त्यांच्यासाठीही लढणार, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तरी राजीनामा देईन, पदावरुन राहून आपण काय करु शकत नसलो तर त्याचा उपयोग काय ? वेळ आली तर राजीनामा देईन असं त्यांनी सांगितले. तर पोलीस भरतीवर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.
सर्व समाजांबद्दल मला आदर आहे, प्रत्येकाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे, न्यायालयानेही सर्व लोकांना समान अधिकार द्यावेत न्याय मिळाला नाही तर उद्रेक होणं स्वाभाविक आहे. मराठा आरक्षणावर सरकारने काही केलं तर ठीक, नाहीतर राजकारणाला रामराम करणार, राजीनामा देऊन टाकणार, हे मी मनापासून सांगतोय असं उदयनराजे म्हणाले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केले.
त्याचसोबतच सध्या लोकशाही आहे, राजेशाही असती तर दाखवलं असतं. अन्याय होत असेल तर लोकशाहीच्या राजांनी राजासारखं वागावं इतकचं माझं म्हणणं आहे. लोकांनी निवडून द्यायचं मग त्याच भान ठेवायला हवं, प्रत्येकाला न्याय देण्याची भावना असली पाहिजे. अन्यथा राजेशाही आणा, मग दाखवतो, काय करायचं अन् काय नाही असंही उदयनराजेंनी ठणकावून सांगितले.
Read Also
राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याला कोरोनाची लागणhttps://t.co/7gIcDG2Tj2#NCP #SharadPawar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 18, 2020