IMPIMP
uddhav thackeray mumbai (1) uddhav thackeray mumbai (1)

विधान परिषदेला ठाकरे तिसरा उमेदवार देणार अन् गेम करणार ? क्रोस व्होटिंगबाबत ठाकरे काय म्हणाले ?

मुंबई : महाराष्ट्र विधआन परिषदेच्या ११ आमदारांचा ६ वर्षीय कार्यकाळ २७ जुलैला संपत आहेत. त्यामुळे आता येत्या १२ जूलै रोजी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. ०२ जूलैपर्यंत या जागांसाठी अर्ज दाखल करता येणार आहे. या निवडणुकीत ११ जागांपैकी महायुतीचे ०९ उमेदवार सहज जिंकतील असं बोललं जात आहे. मात्र महाविकास आघाडीच्या तिसऱ्या उमेदवारामुळे महायुतीचं गणित बिघडणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली.

हेही वाचा..“हेमंत सोरेन यांच्या १४९ दिवसांच्या लढ्याला आज न्यायाचा मार्ग मिळाला”, शरद पवारांनी एनडीए सरकारकडे केली ‘ही’ मागणी 

विधान परिषदेच्या जागेसाठी उमेदवार उतरवण्यासाठी आमच्याकडे ११ आमदार आहेत. २ उमेदवार कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे असतील. मात्र आम्ही तिसरा उमेदवार उतरवणार आहोत. त्याचे संख्याबळ कसे असेल हे येणाऱ्या काळात दिसेल. असं सांगत उद्धव ठाकरे यांनी क्रास व्होटिंगबाबत संकेत दिले आहेत. तसेच राजकीय गणिते ही सार्वजनिकरित्या मांडायची नसतात. आमचा उमेदवार कसा विजयी होणार हे सांगण्याची गरज नाही. आमच्याकडे संख्याबळ आहे. असंही ठाकरे म्हणाले.

विधानसभेत अजित पवार गटाकडे ४१, एकनाथ शिंदेंकडे ४० आणि भाजपकडे १०३ आमदार आहेत. असे मिळून महायुतीकडे १८४ आमदारांचे पाठबळ आहे. तर महाविकास आघाडीकडे कॉंग्रेसचे ३७, उद्धव ठाकरे गटाचे १३ आणि शरद पवार गटाचे १५ आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी त्यांचे २ उमेदवार निवडून आणण्यासाठई पुरेसे संख्याबळ आहे. परंतु तिसरा उमेदवार विजयी करण्यासाठी महाविकास आघाडीला काही मतांची गरज पडणार आहे. त्यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीं शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिलाय.

हेही वाचा…शेकापच्या जयंत पाटलांना कॉंग्रेस अन् शरद पवार गटाचा पाठिंबा, परंतु ठाकरे गट…? 

उद्धव ठाकरेंकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली तर शेकापचे जयंत पाटील हे तिसरे उमेदवार ठरू शकतात. त्यामुळे महाविकास आघाडी विधान परिषदेसाठी संख्याबळ कसं जुळवणार हे पाहणे गरजेचे आहे. २०२२ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. संख्याबळ असूनही मविआ उमेदवाराचा पराभव करण्यात भाजपाला यश आलं. या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झालं होते. त्यानंतरच राज्यात सत्तांतर घडलं होते.

READ ALSO :

हेही वाचा…“अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी अन थापांचा महापुर,” ठाकरेंची खरमरीत टिका 

हेही वाचा…“जब चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने”, महायुतीच्या अर्थसंकल्पावर कॉंग्रेसची जबरी टिका

हेही वाचा..लेक लाडकी योजनेची अजित पवारांकडून घोषणा, महिलांना प्रतिमहिना मिळणार इतके रूपये 

हेही वाचा…पोर्शे कार अपघात प्रकरणात फोन कोणी केले ? दबाव कोणी आणला ? आव्हाडांचे परखड सवाल, फडणवीसांनी दिलं हे उत्तर

हेही वाचा…पोर्शे कार अपघात प्रकरणात फोन कोणी केले ? दबाव कोणी आणला ? आव्हाडांचे परखड सवाल, फडणवीसांनी दिलं हे उत्तर

Leave a Reply