मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलच तापलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटात ठाण्यात तुफान राडा झाला आहेे. या हल्ल्यामध्ये एक जण जखमी झाला आहे. जखमी कार्यकर्त्याला ठाण्याचा सिव्हिल रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्यानंतर ठाकरे गट श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे.
ठाण्यातील किसन नगर येथे ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आले. ठाकरे गटाकडून ठाण्यात मेळावा घेण्यात आला. यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते योगेश जानकर त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत मेळाव्याच्या ठिकाणी आल्याने दोन्ही गटात वाद होऊन हाणामारी झाली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेदेखील घटनास्थळी उपस्थित होते.
ठाण्यातील किसन नगर येथे ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आले. ठाकरे गटाकडून ठाण्यात मेळावा घेण्यात आला. यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते योगेश जानकर त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत मेळाव्याच्या ठिकाणी आल्याने दोन्ही गटात वाद होऊन हाणामारी झाली. pic.twitter.com/OxCd1ubUPW
— पवन/Pawan 🇮🇳 (@ThePawanUpdates) November 15, 2022
नेमकं काय घडलं
किसननगर येथील भटवाडी परिसरात ठाकरे गटाचे संजय घाडीगावकर यांच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे ही उपस्थित होते. त्याचवेळी शेकडो शिंदे गटाचे कार्यकर्ते त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यास सरूवात केली. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली.
या घटनेपुर्वी सोमवारी संध्याकाळी देखील ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. त्यानंतर पुन्हा मध्यरात्री देखील कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडलेत. दरम्यान, हा राडा करण्यासाठी ठाण्याबाहेरून माणसं मागवण्यात आली होती, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.