भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या निवृत्तीच्या चर्चांना अखेर त्याने पुर्णविराम दिला. ऑगस्टच्या दिवशीच महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अनेकांनी धोनीच्या अशा निवृत्तीवर आश्चर्य व्यक्त केले. तर क्रिकेट चाहते देखील भावूक झाले.
.@msdhoni has mesmerized millions through his unique style of cricket. I hope he will continue to contribute towards strengthening Indian cricket in the times to come. Best wishes for his future endeavours.
World cricket will miss the helicopter shots, Mahi!
— Amit Shah (@AmitShah) August 15, 2020
देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देखील धोनीच्या निवृत्तीबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट केले की, ‘एमएस धोनीने आपल्या क्रिकेटच्या अनोख्या शैलीने लाखो लोकांना मंत्रमुग्ध केले होते. मला आशा आहे की आगामी काळातही भारतीय क्रिकेट बळकट करण्यासाठी तो आपले योगदान देत राहतील. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ‘वर्ल्ड क्रिकेट हेलिकॉप्टर शॉट मिस करेल, माही!’
धोनीने इंस्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्याच्यापाठोपाठ काही मिनिटातच सुरेश रैनाने देखील आपण देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे म्हटले.