नाशिक : एरंडोल येथील काँग्रेसचे कार्यक्षम नगरसेवक योगेश महाजन यांची एरंडोल नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे. एरंडोलमध्ये महाजन हे एकमेव असे नगरसेवक आहेत जे काँग्रेसच्या चिन्हावर विजय मिळवून नगरसेवक झालेले होते. महाजन हे कार्यक्षम असल्याने पक्षाने त्यांच्यावर अजून एक महत्वाची जबाबदारी सोपवल्याचे पहायला मिळते.
पक्षाविषयीची त्यांची निष्ठा आणि तरुणांचे संगठन करण्याचे कौशल्य पाहून महाजन यांच्याकडे या आधी देखील नाशिक शहर जिल्हा सह प्रभारी पदाची जबाबदारी सत्यजित तांबे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोपवली आहे.
उपनगराध्यक्ष हा आरोग्य सभापती असतो आणि सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे पद खूप महत्वाचे असणार आहे.त्यामुळे या काळात जी जी मदत मला करता येईल ती सर्व मदत नागरिकांसाठी करण्याचा प्रयत्न करू आणि कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी प्रतिक्रिया यानिमित्ताने योगेश महाजन यांनी दिली.
सत्यजित तांबे यांच्याकडून देखील महाजनांचे कौतुक
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव व नाशिकचे सहप्रभारी योगेश महाजन यांची एरंडोल नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ! pic.twitter.com/QGdjZSj0e0
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) September 28, 2020
Read Also
फोटो भगत सिंह यांचा श्रद्धांजली चंद्रशेखर आझाद यांना ! शिवसेनेच्या खासदारावर नेटकरी संतापलेhttps://t.co/dHPO3HJfH0#ShivsenaMP #PriyankaChaturvedi
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 28, 2020