बीड : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी उद्या (शनिवारी) बीडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाचे आयोजन केलं आहे.परंतू, उद्याचा बीडचा मोर्चा हा मराठा समाजाचा नसून भाजपचा आहे. मराठा समाजाचा मोर्चा असता तर आम्हीही त्यात सहभागी झालो असतो, अशी टीका काँग्रेसने मेटेंवर केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे यांनी ही टीका केली आहे.
लाखे म्हणाले, उद्याचा बीडचा मोर्चा मराठा समाजाचा नाही. मराठा समाजाचा या मोर्चाशी काहीही संबंध नाही. हा मोर्चा निव्वळ भाजपचा आहे. विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील हे भाजपच्या प्रचार समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे मोर्चा कुणाचा आहे हे स्पष्ट होते, असं सांगतानाच विनायक मेटे खोटं बोलण्याचं काम करत आहेत.
ते पुढे बोलताना म्हणाले, उद्याचा मोर्चा राजकीय पक्षाचा नसल्याचं मेटे सांगत आहे. कारण मेटेंना मी एकटाच शहाणा आहे असं वाटत आहे. पण समाज मूर्ख नाही. नरेंद्र पाटील आणि मेटे भाजपच्या प्रचार समितीचे सदस्य नसते तर आम्हीही त्यांच्यासोबत मैदानात उतरलो असतो. भाजप पुरस्कृत उद्याच्या मोर्चाला आमचा विरोध आहे, असं सांगतानाच भाजपने मराठा आरक्षणासंदर्बात न्यायालय आणि समाजाची फसवणूक केली आहे, असा दावाही लाखे यांनी केला आहे.
Read Also :