नवी दिल्ली : रविवारी पाच खासदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. लोकसभेतील खासदारांची कोरोना चाचणी केली होती. काही खासदारांचे काल रिपोर्ट आले तर काहींचे आज. त्यामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. सकाळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लोकसभेत ही माहिती दिली. कसभेतील मिनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे यांच्यासह १७ खासदारांना कोरोनाची लागण झल्याची माहिती समोर आली आहे .
संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी खासदारांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात पाच जणांचा रिपोर्ट पाॅजिटीव आला आहे तर अद्याप काही खासदारांचा कोरोना रिपोर्ट येणे बाकी होते. ते आता आले असून एकूण १७ खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खबरदारी घेण्यात येत आहे. आरोग्य
मंत्रालयाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाईल.
यावेळी संसद शनिवारी आणि रविवारी सुरू असणार आहे. त्यामुळे सकाळी लोकसभा आणि दुपारी राज्यसभा असे कामकाज सुरु असणार आहे तसेच लोकसभेत आणि राज्यसभेत कागदाचा वापर कमी करण्यात आलाय. यावेळी संसद भवनात संपूर्णपणे डिजिटल पत्रव्यवहार होणार आहे खासदार आपली उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवनार आहेत