मुंबई : प्राप्तीकर खात्याने गेल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांशी संबंधित प्रतिष्ठाने आणि निवासस्थानांवर घातलेल्या छाप्यांमध्ये १८४ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. मोक्याच्या ठिकाणी मालमत्ता खरेदी करण्यासाठी गैरमार्गाने मिळालेला हा पैसा वापरण्यात आल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिली.
प्राप्तीकर खात्याने ७ ऑक्टोबर रोजी मुंबई, बारामती, गोवा व जयपूर येथील बांधकाम क्षेत्रातील दोन समूहांच्या १० ठिकाणांवर छापे घालण्यात आले होते. त्यात १८४ कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे. या कारवाईत २.१३ कोटी रुपये बेहिशेबी रोख व ४.३२ कोटी रुपयांचे दागिने ताब्यात घेण्यात आले.
अजित पवार घोटाळा
9 दिवसांचे आयकर छापे
मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूर… 70 ठिकाणी छापे
१००० हून अधिक कोटींचे जमीन, सदनिका, ऑफिस, साखर कारखाने….
कोट्यवधी रुपये रोख आणि ज्वेलरी
184 कोटी बेनामी संशयास्पद व्यवहार @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/RWLb0uawoP
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 16, 2021
दोन समूहांनी विविध कंपन्यांशी संशयास्पद आर्थिक व्यवहार केल्याचे आढळले आहे. त्यात बोगस शेअर प्रीमियम, संशयास्पद असुरक्षित कर्जे, नसलेले वाद लवादातून सोडविल्याचे भासवून मिळविलेला पैसा आहे. हा पैसा प्रभावी कुटुंबाच्या सहभागाने मिळाल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे. कोल्हापूर व पुणे जिल्ह्यात तीन बहिणींशी संबंधित मालमत्तांवर छापे घातल्याची माहिती अजित पवार यांनी ७ तारखेला दिली होती.
Read Also :
- राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांना पराभूत करा अन् सोन्याचा मुकुट मिळवा; चंद्रकांत पाटलांची भन्नाट ऑफर
- मुखवटा काढा आणि मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा होती हे मान्य करा – देवेंद्र फडणवीस
- सायकल चोरणारे नारायण राणे केंद्रीय मंत्री झाले – शिवसेना नेते गुलाबराव पाटील
- पंकजाताई, सत्तेत असताना तुम्ही मंत्रीपद भाड्याने दिले होते का? धनंजय मुंडेचा पलटवार
- साखर कारखान्याचा संचालक झाल्यावर लग्न कसं जमलं? अजित पवारांनी सांगितला भन्नाट किस्सा!