नवी दिल्ली : देशाच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे एक मोठे नेते भाजपचा भगवा हाती घेणार आहेत. दुपारच्या सुमारास काँग्रेसचे हे मोठे नेते भाजपत प्रवेश करतील. विशेष म्हणजे खुद्द भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करणार आहेत. दिल्ली येथील भाजप मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडणार असल्याचे समजते. मात्र, अद्याप काँग्रेसच्या या बड्या नेत्याचे नाव समोर आलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे नेते उत्तर भारतातील एका राज्याशी संबंधित आहेत.
पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होत आहे. राजकीय दृष्ट्या उत्तर प्रदेश हे देशातील एक अत्यंत महत्वाचे राज्य आहे. भाजप येथील निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. अशातच काँग्रेसच्या या मोठ्या नेत्याचा भाजप प्रवेश म्हणजे, काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, प. बंगालमधील मुकूल रॉय हे एकेकाळी ममता बॅनर्जीचे उजवे हात असल्याचे मानले जात होते. परंतू निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, शिवाय त्यांना भाजपमध्ये मोठे पद देखिल देण्यात आले होते. निवडणुकीत ते स्वत: निवडूण आले. मात्र त्यांच्या मुलाला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत पं. बंगालच्या नव्या सरकारबद्दल सहानुभूती दाखलवली होती. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मुकूल रॉय यांच्या पत्नीला कोरोना झाल्याने त्या रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. दरम्यान ममता बॅनर्जीचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांची रुग्णालयात जावून भेट घेतली असल्याने राजकीय वर्तूळात खळबळ माजली आहे.
Read Also :
- शेतकऱ्यांच्या नावावर केंद्र सरकार पेट्रोल- डिझेलमध्ये लूट करतंय – नाना पटोले
- खरे कोण, खोटे कोण? हे सिद्ध झाले; शिवसेनेकडून एकच जल्लोष
- ठाकरे सरकार पाच वर्ष टिकणार का?; आदित्य ठाकरे म्हणतात….
- ठरलं तर मगं.! १५ जूनला ओबीसी समाज राज्यव्यापी आंदोलन करणार
- काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या दारी भाजप नगरसेवकांनी, महापालिकेतील गैरव्यवहाराचा मांडला लेखाजोखा