अमरावती : खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र (दि.८) मंगळवारला कोर्टाने अवैध ठरण्यात आल्याने, राणा यांची खासदारकी धोक्यात असल्याचे बोलले जात आहे. अमरावतीमध्ये खासदार राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्याने स्थानिक शिवसैनिकाकडून जल्लोष करताना बघायला मिळाला आहे. राजकमल चौक, सक्करसाथ, अंबागेट या परिसरात आतषबाजी करून शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला. हायकोर्टाचा हा निर्णय म्हणजे सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी दिली.
खासदार नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्राचा मुद्दा अधिक काळापासून राजकारणात चर्चा विषयी ठरलेला आहे. त्यानंतर तो न्यायालयात गेला. आता उच्च न्यायालयाकडून खासदार राणा यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. ही बातमी शहरात पसरताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. राजकमल चौकात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे तसेच सहसंपर्क प्रमुख प्रवीण हरमकर यांच्या नेतृत्वात ढोलताशांसह आतषबाजी करण्यात आली तर अनेक शिवसैनिकांनी एकमेकांना पेढे भरवून शुभेच्छा दिल्यात.
आनंदराव अडसूळ आणि नवनीत राणा वाद
नवनीत राणा यांनी २०११ साली राजकारणामध्ये प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर २०१४ ची लोकसभा निवडणूक देखील लढविली. मात्र, यामध्ये सेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीपूर्वी एका टीव्हीवरील कार्यक्रमामध्ये नवनीत राणा आणि खासदार आनंदराव अडसूळ यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यानंतर नवनीत राणा यांनी अडसूळांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. ही तक्रार गाडगेनगर पोलिसांनी निकाली काढली होती. मात्र, त्यावेळी राणा यांना कळविण्यात आले नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. तसेच अडसूळ यांनी राजकीय दबाबतंत्राचा वापर करून हे प्रकरण निकाली काढल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. त्यानंतर राणा यांनी ४ जून २०१८ ला पुनर्विचार याचिका दाखल केली होती. हे प्रकरण निकाली लागत नाहीतर २०१८ ला अडसूळ यांनी राणा यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता.
Read Also :
- ठाकरे सरकार पाच वर्ष टिकणार का?; आदित्य ठाकरे म्हणतात….
- ठरलं तर मगं.! १५ जूनला ओबीसी समाज राज्यव्यापी आंदोलन करणार
- काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या दारी भाजप नगरसेवकांनी, महापालिकेतील गैरव्यवहाराचा मांडला लेखाजोखा
- मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी; २०२२ला भाजपची सत्ता येणार?
- ‘अजित पवारांना गजनी झाला आहे का?’