मुंबई : लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण होणे अद्याप काही कमी झालेले नाही. नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनामुळे रुग्णालयात भरती व्हावे लागले होते.त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या एका प्रमुख खासदाराला देखील कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका बड्या नेत्याला कोरोना संसर्ग झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोना संसर्ग झाला आहे. तटकरे यांनी कोरोना संसर्ग झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे.
अजित पवार सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी गेले होते. तो दौरा अर्धवट सोडून ते माघारी परतले होते. त्यानंतर अजित पवार त्यांच्या घरीच विलगीकरणात होते. अजित पवार यांची पहिली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. सोमवारी अजित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात नियमित तपासणीसाठी दाखल झाले होते. यावेळी त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
त्यानंतर आता सुनील तटकरे यांची सोमवारी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील रुग्णालयात दाखल झालो आहे, असं तटकरे यांनी म्हटलं आहे. सुनील तटकरे मुंबईतील रुग्णालयात दाखल झाले आहेत. कोरोनातून लवकर बरं होऊन पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे, असं तटकरेंनी म्हटलं आहे.
काल माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील इस्पितळात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन.#Covid_19
— Sunil Tatkare (@SunilTatkare) October 27, 2020
दुसरीकडे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले होते. त्यानंतर ते मुंबईतील सरकारी रुग्णालय सेंट जॉर्जमध्ये उपचार घेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिली प्लाझ्मा थेरेपी करण्यात आली आहे.
Read Also
पंकजा मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल, राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाटhttps://t.co/lCJ5UKy0zs#Pankajamunde #BJP @Pankajamunde @DrPritamMunde
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 27, 2020