मुंबई : मलाच काय साध्या तालुका प्रमुखांनाही ते शिवसेनेतून काढू शकत नाही. असं स्पष्ट वक्तव्य शिंदे गटात सामील झालेले आमदार संतोष बांगर यांनी केले आहे. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी त्यांची जिल्हाप्रमुख पदावरून हाकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना ललकारलं आहे. तसेच शिवसेना आमचीच आहे, असंही ते म्हणाले आहेत.
“ओबीसी आरक्षण शिवाय निवडणूका होणार नाहीत”; निवडणुकांबाबत मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
मला काढण्याचा अधिकार कुणालाही नाही, मी अजूनही शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मतदान केले आणि आज बातमी आली की तुम्हाला शिवसेनेच्या जिल्हा अध्यक्ष पदावरून काढलं. हे मला मान्य नाही. माझ्या मतदारसंघातले उपजिल्हा प्रमुख, सह संपर्क प्रमुख, तालुका प्रमुख, सर्कल प्रमुख, उप तालुका प्रमुख, शहर प्रमुख, शाखा प्रमुख यांना कुणालाही काढण्याचा अधिकार नाही. त्यामुळे मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे, आणि राहणाच असंही संतोष बांगर यांनी म्हटलं आहे.
आषाढी एकादशीच्या नरेंद्र मोदींच्या वारकऱ्यांना खास शुभेच्छा; म्हणाले की..;”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील माझी चर्चा झाली आहे. ते म्हणाले की तुच जिल्हा प्रमुख आहेस. त्यामुळे खरी शिवसेना ही आपलीच असून त्याचा निकालही लवकरच लागणार आहे. शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी हाडाचं पाणी करून शिवसेना वाढविली आहे. त्यांनीच मला जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली होती. त्यामुळे आजही शिवसेना जिल्हा प्रमुख आहे, असंही ते म्हणाले.
“पुजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांना क्लिनचीट”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुत्रं फिरवली
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यात राजकीय लढाई सुरू आहे. शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर 16 आमदारांवर अपात्रतेची सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. तर आता शिवसेनेचे 12 खासदार देखील शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
Read also
- पंकजा मुडेंना मंत्रीपद मिळण्यासाठी मुंडे समर्थकांकडून वैद्यनाथाला साकडे
- “यापेक्षा आणखी मोठा पुरावा कोणता हवा?” बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर भाजपची प्रतिक्रिया
- “बंडखोर आमदारांवर सध्या कोणतीही कारवाई नको,” सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटाला दिलासा
- “आईच्या दुधाशी बेईमानी करु नका हा निष्ठेचा मंत्र तुम्ही जपला”; ठाकरेंचा 16 आमदारांना भावनिक पत्र
- “आमच्या घरी आजही शिवसेना प्रमुखांचा फोटो आहे”; बंडखोर आमदार सदा सरवणकरांचं वक्तव्य