मुंबई : खासदार नवनीत राणा आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वाद काही महिन्यांपासून चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि नवनीत राणा यांच्यात हनुमान चालीसा प्रकरणामधील वाद महाराष्ट्रातील जनतेने पाहिला आहे. या वादानंतर आता नवनीत राणांनी संजय राऊत यांच्यावर एक खळबळजनक विधान केलं आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध खासदार नवनीत राणा यांच्यातील वाद पुन्हा पाहायला मिळाला आहे.
आमची बाजू भक्कम, आमच्याच बाजूने निर्णय लागेल; न्यायालयाच्या सुनावणींवर फडणवीसांची प्रतिक्रिया
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर ईडीची कारवाई सुरु होती. आज संजय पांडे यांना ईडीने अटक करण्याचे आदेश दिले आहेत. संजय पांडे यांच्यानंतर आता पुढचा नंबर शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते अनिल परब यांचा आहे. दोघांना अटक होणार, असं विधान खासदार नवनीत राणा यांनी केले आहे. त्यामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना राज्यपालांनी शिंदेना शपथ दिलीच कशी?
जेव्हा ईडी कुणावर कारवाई करते, तेव्हा ती पूर्ण पुरावे आणि साक्षीनिशी करते. पुराव्याशिवाय इडीकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या नंतर महाराष्ट्रात खुप नेत्यांचे नंबर येणार आहेत. मागच्या सहा-सात महिन्यातले दिवस पाहिल्यास अनिल परब यांची अनेक वेळा चौकशी झाली आहे. परब यांनी दिलेली उत्तरे इडीला समाधानकारक नाहीत. त्यमुळे त्यांना वारंवार चौकशीला बोलवल जात आहे. तसेच संजय राऊत यांच्यावरही अनेक वेळा इडीकडून चौकशी झाली आहे. आता संजय पांडे जेलमध्ये गेले आहेत आता नक्कीच राऊतांचा नंबर लागणार, असंही नवनीत राणा म्हणाल्या.
“तर बाळासाहेबांना आम्हीच शिवसेनेत आणलं, असंही ते उद्या म्हणतील”
यावरून नवनीत राणा या छान भविष्यवाणी करतात. न्यायिक बाजू आणि जे काही आहे यावर मी बोलणार नाही, मात्र शिवसेनेचे जे दोन्हा वाघ आहेत, ते या सगळ्याला निभावून जातील. मात्र आत्तापर्यंत दिल्ली गल्लीत बघत नव्हती मात्र आता दिल्ली गल्लीत बघायला लागली, असा टोला शिवसेना नेत्या किशेरी पेडणेकर यांनी नवनीत राणा यांना लगावला आहे.
Read also
- “ओबीसींना राजकीय आरक्षणाबाबत मविआ सरकारला यश आलं”; रोहित पवार
- “ओबीसी आरक्षणाचा आमच्या महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला”; देवेंद्र फडणवीस
- मोठी बातमी.. ! ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे न्यायालयाचे आदेश
- “आम्हाला दुसऱ्याच्या घरात झाकून पाहण्याची सवय नाही”; नाना पटोलेंचा बोंडेंना प्रत्युत्तर
- “आम्हाला दुसऱ्याच्या घरात झाकून पाहण्याची सवय नाही”; नाना पटोलेंचा बोंडेंना प्रत्युत्तर