अमरावती : राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार अन् तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथ विधी सगळ्यांना माहिती आहे. त्यावरून विरोधक अजित पवारांना सातत्याने डिवचत आहेत. यावर अजित पवार देखील त्यांना प्रतिसाद हसून देतात. यातच भाजपच्या आमदारांनी एका कार्यक्रमात याची आठवण काढली आहे.
“A फॉर अमित शाह सुद्धा होतं,” विकृतीचं नाव ठेवणाऱ्या राणेंना जोरदार प्रत्युत्तर
अमरावती एका कार्यक्रमात भाजपचे आमदार प्रवीण पोटे अन् अजित पवार उपस्थित होते. त्या कार्यक्रमाच्या भाषणाच्या वेळी प्रवीण पोटे यांनी पहाटेच्या शपथविधीची आठवण काढली. ते म्हणाले की, तो शपथविधी सकाळच्या ऐवजी दुपारी झाला असता ते आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते. असं म्हणत पोटे यांनी पुढे सांगितले की, त्यानंतर मात्र सावध होत हे मी गमंतीने म्हटले आहे. मनावर घेऊ नका, रागावू नका, अशी विनंती पोटे यांनी केली.
“यंत्रणा आता कुणाला काही सोडत नाय”, संजय शिरसाठांचा ठाकरे गटाला इशारा
तसेच पुढे बोलतांना त्यांनी अजित पवारांचं कौतुकही केलं. अजितदादा वेळेचे प्रचंड पक्के आहेत. दादा विधानमंडळात अथवा मंत्रालयात सकाळी सातलाच येतात. त्यांच्याकडून आम्हाला वेळेचं नियोजन करण्याबाबत शिकले पाहिजे. असंही ते म्हणाले.
Read also
- पवार साहेबांचा तुम्हाला फोन आला होता का? अन् अजित पवार भडकले, नाराजीवरील चर्चा फेटाळली
- “लोकशाहीमध्ये संस्कृती कशी जपावी हे अजित पवारांकडून शिकावं” उदय सामंत
- “मंत्रीपदासाठी लोक हजारो, कोटी देण्यास तयार असतात पण…;” संजय गायकवाड यांचं मोठ वक्तव्य
- जंयत पाटलांचं निलंबण..! पुतणे अजित पवार यांच्यावर काका शरद पवार नाराज?
- “तर फडणवीस उपमुख्यमंत्री पदावरही राहणार नाहीत”; फडणवीसांना भाजपचाच आहेर