पुणे : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून विधानसभेत मोठा राडा बघायला मिळाला. याप्रकरणाची आता एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याचवेळी भास्कर जाधव यांना बोलू न दिल्याने जंयत पाटलांनी अध्यक्षांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. अन् त्यानंतर जंयत पाटलांना निलंबित करण्यात आलं.
“यंत्रणा आता कुणाला काही सोडत नाय”, संजय शिरसाठांचा ठाकरे गटाला इशारा
जयंत पाटलांना निलंबित केल्यानंतर विरोधी पक्षातील आमदार अजित पवारांवर नाराज असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले.
“राजकारणाचं काय खरं नाय”, वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट जोरदार चर्चेत
त्यावर आक्रमक भूमिका घेण्याऐवजी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त करत जंयत पाटील यांची चुक मान्य केल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये नाराजी निर्माण झाली असून या प्रकरणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांना फोन करून माहिती घेतल्याचं समजत आहे.
“मोदीजी हेच का अच्छे दिन..!” 2021 मध्ये तब्बल 42, 004 मजुरांच्या आत्महत्या
दरम्यान, अजित पवारांना याबद्दल प्रश्न विचारत त्यांनी पत्रकारांना प्रति प्रश्न केला. हा सर्व चर्चा धांदात खोटं आहे. तुम्हाला हे कुणी सांगितलं होतं. पवार साहेबांनी तुम्हाला फोन करून सांगितलं का ? असं म्हणत अजित पवार माध्यमांवरच संतापले. मी तर साहेबांच्या रोज संपर्कात असतो. आपल्या ज्ञानामध्ये अशी कुणी भर घातली आहे. तुम्हाला ब्रेकिंग न्युज काही मिळत नाही. त्यामुळे तुम्ही अशा बातम्या पसरवतात. अन् लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतात. त्यामुळे मी 32 वर्ष राजकारण केलं आहे. त्यामुळे तुम्ही माझी काळजी करू नका. असंही अजित पवार म्हणाले.
Read also
- “लोकशाहीमध्ये संस्कृती कशी जपावी हे अजित पवारांकडून शिकावं” उदय सामंत
- “मंत्रीपदासाठी लोक हजारो, कोटी देण्यास तयार असतात पण…;” संजय गायकवाड यांचं मोठ वक्तव्य
- जंयत पाटलांचं निलंबण..! पुतणे अजित पवार यांच्यावर काका शरद पवार नाराज?
- “तर फडणवीस उपमुख्यमंत्री पदावरही राहणार नाहीत”; फडणवीसांना भाजपचाच आहेर
- “A फॉर अमित शाह सुद्धा होतं,” विकृतीचं नाव ठेवणाऱ्या राणेंना जोरदार प्रत्युत्तर