IMPIMP

‘मला काहीही बोलायचं नाही’; पार्थ पवारांविषयी बोलण्यास अजित पवारांचा नकार

अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून ते विविध विकास कामांची पाहणी करत आहेत. बारामती मतदारसंघातील विकासकामांची पाहणी करणे आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अजित पवार बारामतीत आहेत. विशेष म्हणजे पार्थ पवार प्रकरणानंतर अजित पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही

अजित पवार यांना पार्थ पवारांविषयी पत्करानी प्रश्न विचारले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवारविषयी बोलण्यास नकार दिला आहे. मला कुणाशीही काही बोलायचं नाहीय. मला माझं काम करायचं आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

मला कुणाशीही काही बोलायचं नाही. मला माझं काम करायचं आहे. मी सकाळी सकाळी या अधिकाऱ्यांना इकडे आणलंय, असं म्हणत अजित पवारांनी पार्थ पवार प्रकरणावर बोलण्याचं टाळलं.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून पार्थ पवार प्रकरणानंतर अजित पवार नाराज असल्याचे तर्क वितर्क लावले जात आहेत. पार्थ पवार प्रकरणानंतर अजित पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.