मुंबई : देशातील मोठमोठ्या शहरांमध्ये ओला-उबेर इत्यादी ऑनलाइन टॅक्सी बुकींगचा मोठा प्रमाणात वापर होते. महाराष्ट्रातील मुंबई-पुणेसारख्या शहरांमध्ये याचा सर्रास वापर होतो. आरामदायी प्रवासासाठी लोक अशा टॅक्सींची बुकींग करतात. कंपन्यांनी चारचाकी टॅक्सीसोबतच आता मोटारसायकलवरुन प्रवाशांना सोडण्याची सोयदेखील केली आहे. पण, कधीकधी हा प्रवास आपल्या जीवावर बेतू शकतो. अशाच प्रकारची एक घटना पुण्यात घडली आहे.
पत्रकारांच्या रोखठोक प्रश्नांनी रायन ब्रागांझा घायाळ; मायकल लोबोंसमोरच झाली शाब्दिक चकमक
पुण्यात ओला कंपनीची बुकींग घेणाऱ्या एका मोटारसायकल चालकाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या फेसबूकवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. एका प्रवाशाला घेण्यासाठी आलेला चालक दारुच्या नशेत आढळून आलाय. तसेच त्याच्या खिशातही देशी दारुची बाटली आढळल्याने अशा प्रकारची वाहतूक करणाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
व पालकमंत्री @AjitPawarspeaks हे आपल्याच आशिर्वादाने होत आहे का? वसूलीचे लाभार्थी कोण? मद्यधुंद सरकारपण या चालकाप्रमाणेच तोकड्या पैशांसाठी प्रवाशांचा जीव धोक्यात घालतंय, आंदोलनाशिवाय यांचा नशा उतरणार नाही का?
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) February 3, 2022
गोपीचंद पडळकर व्हिडिओ शेअर करत म्हणतात, ‘ओला, उबेर, रेपिडो, झूम अशा ॲपचा वापर करुन सर्रास अवैधरित्या दुचाकी टॅक्सी म्हणून दुरूपयोग केला जातोय. मात्र हजारोचा टॅक्स भरणाऱ्या ॲटोरिक्षा चालकांच्या पोटावर लाथ मारली जातेय. परिवहन मंत्री अनिल परब व पालकमंत्री अजित पवार हे आपल्याच आशिर्वादाने होत आहे का? वसूलीचे लाभार्थी कोण? मद्यधुंद सरकारपण या चालकाप्रमाणेच तोकड्या पैशांसाठी प्रवाशांचा जीव धोक्यात घालतंय, आंदोलनाशिवाय यांचा नशा उतरणार नाही का?’ असा सवाल पडळकर यांनी विचारला आहे.
‘जोशुआ यांनी आपली नेतृत्व क्षमता सिद्ध करून दाखविली, कांदोळकर यांच्यात नेतृत्व गुण नाही’
काही स्थानिक तरुणांनी त्या व्यक्तीचा व्हिडिओ काढला असून, याबाबत त्यांनी सरकार आणि अजित पवारांना जाबदेखील विचारला आहे. व्हिडिओमध्ये तो व्यक्ती मी ओलाचा चालक असून, प्रवाशाला घेण्यासाठी आल्याचे सांगत आहेत. तसेच, मी दारुन पिऊन आलोय, असेही तो यावेळी सांगत आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करणार, हे पाहणे महत्वाचे आहे.
Read also:
- अखेर ठाकरे सरकारची माघार; भाजपच्या १२ आमदारांच निलंबन घेणार मागे?
- दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार; राज्य शिक्षण मंडळाची घोषणा
- उद्धव ठाकरे-अजित पवार म्हणजे ढवळ्या पवळ्याची जोडी – बंडातात्या कराडकर
- देवेंद्र फडणवीसांनी ‘त्या’ मामाजींना भेटावं; मंत्री नवाब मलिकांचा अजब सल्ला
- शिवसैनिक परब यांच्यावरील हल्याचा कट पुण्यात रचला; नितेश राणेंना पुण्याला नेण्याच्या तयारीत