म्हापसा : गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र चालूच आहे. यातच आता माजी उपनगराध्यक्ष विनोद फडके यांनी कॉंग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. २०१७ च्या पोटनिवडणुकीत मी सुधीर कांदोळकरांना पाठिंबा दर्शविला होता. मात्र, सुधीर यांना योग्य धोरण अवलंबिता आले नाही. सुधीर कांदोळकर यांच्यात नेतृत्व गुण नाही, अशी टीका विनोद फडके यांनी केली.
भाजप आमदार नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी; जामिनाचा मार्ग मोकळा?
उत्तर गोवा भाजप कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा भाजपा नेते रोहन कवळेकर, बार्देश भंडारी समाजाचे अध्यक्ष नारायण मांद्रेकर आदी नेते उपस्थित होते. दरम्यान, विनोद फडके यांनी येत्या निवडणुकीत म्हापशाचे भाजपाचे उमेदवार जोशुआ डिसोझा यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे.
मुंबईत राज ठाकरेंची मनसैनिकांसोबत बैठक; बुलढाण्यात तब्बल २८ पदाधिकाऱ्यांचा पक्षाला ‘रामराम’
पुढे बोलताना ते म्हणाले, २०१७ मध्ये जोशुआ हे नवखे असल्याने त्यांना राजकारण जमणार नाही, असे मला वाटते होते. मात्र, जोशुआ यांनी आपली नेतृत्व क्षमता सिद्ध करून दाखविली. पालिका निवडणुकीत स्वतः च्या हिंमतीवर भाजपप्रणित पालिका मंडळ स्थापन करुन दाखविल्याचे फडके म्हणाले.
युतीच्या चर्चेत पडू नका, स्वबळावर लढायचयं, महापालिका निवडणुकीच्या कामाला लागा – राज ठाकरे
दरम्यान, यावेळी कॉंग्रेस नेते मायकल लोबो यांच्यावरमाजी नगराध्यक्ष तथा भाजपा नेते रोहन कवळेकर यांनी तोफ डागली. लोबो कचरा व्यवस्थापन मंत्री असताना त्यांनी म्हापशासाठी कोणती मदत केली, ते सांगावे. कळंगुटमधील घरे नियमित करून देण्यासोबतच, तेथील राणकार, मच्छीमार बांधवांची त्यांनी नेहमीच फसवणूक केल्याचा आरोप रोहन कवळेकर यांनी केले.
Read also:
- हम झुकेंगे नहीं.! खासदार संजय राऊतांच केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईला उद्देशून सूचक ट्विट
- पत्रकारांच्या रोखठोक प्रश्नांनी रायन ब्रागांझा घायाळ; मायकल लोबोंसमोरच झाली शाब्दिक चकमक
- आपणं यांना पाहिलंत का? माननीय खासदार हरवल्या आहेत; पूनम महाजनांविरोधात शिवसैनिकांची आक्रमक बॅनरबाजी
- समय बडा बलवान होता है; कोठडीत जाण्यापूर्वी ट्विटकरत नितेश राणेंचा शिवसेनेला गंभीर इशारा
- सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय सरकार मागे घेणार? शरद पवारांचे सुचक वक्तव्य