मुंबई : राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांची मुंबईत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचे नेते, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. आगामी मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित कऱण्यात आली होती. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.
मोठी बातमी: नितेश राणे सिंधुदुर्ग कोर्टात शरण जाणार, राणेंची गाडी न्यायालयाच्या दिशेने रवाना
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, युतीच्या चर्चेत पडू नका. तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा. तुमच्या मनात विषय येत असेल युतीच काय होणार?, युती होईल की नाही ते पुढे बघू तुमची स्वतंत्र लढण्याची तयारी असली पाहिजे. महानगरपालिका निवडणुकांसाठी स्वतंत्र्य लढण्याच्या तयारीत रहा युती ही गोष्टीमध्ये अडकू नका.
गॉडफादरच्या रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्यांना घरी पाठवा; रोहन खंवटे यांचे आवाहन
दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात मनसेच्या नाराज पदाधिका-यांनी संपर्क प्रमुख विठ्ठल लोखंडकर यांच्याकडे तब्बल २८ जणांचे राजीनामे देऊन मनसे पक्षातून बाहेर पडल्याची घोषणा केली. जिल्हाध्यक्ष यांनी विश्वासात न घेता नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्याच्या निर्णया विरोधात पक्ष सोडल्याचे पत्रात नमूद करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील सिंदखेडराजा व देऊळगांवराजा तालुक्यातील २८ पदाधिका-यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे मनसेच्या संपर्क प्रमुख व जिल्हाध्यक्ष यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण उभं राहिलं आहे.
Read also:
- भाजप आमदार नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी; जामिनाचा मार्ग मोकळा?
- प्रभाग रचना : सत्ताधारी भाजपा किमान १० प्रभागांमध्ये हरकती नोंदवणार: विधानसभा प्रभारींची आक्रमक भूमिका
- खासदार संजय राऊतांना धक्का; जमीन घोटाळा प्रकरणात निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक
- मुंबईत पेगाससवरुन भाजप आणि काँग्रेस आमने सामने; आमदार लाड आणि पोलिसांत झटापट
- समीर वानखेडेंना महाविकास आघाडी सरकारचा दणका; बारचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द