सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे यांच्याबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी नितेश राणे यांचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग सेशन्स कोर्टाने फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात जामीनासाठी पुन्हा एकदा धाव घेतली होती. पण हायकोर्टाने पुन्हा सिंधुदुर्ग सेशन्स कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिल्याने नितेश राणे आता सिंधुदुर्गच्या सेशन्स कोर्टात सरेंडर होणार, अशी माहिती आता समोर आली आहे. सिंधुदुर्ग सेशन्स कोर्टाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. त्यांनी 111 पानांचा जामीन अर्ज दाखल केला होता. पण हायकोर्टाकडूनही त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे अखेर नितेश यांनी सिंधुदुर्ग सेशन्स कोर्टात सरेंडर होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
इंदापूर तालुक्यात दडपशाहीचं राजकारण खपवून घेणार नाही; अंकिता पाटलांचा दत्तात्रय भरणेंना इशारा
नितेश राणे यांची कोर्टात बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी याबाबत भूमिका मांडली आहे. “नितेश राणे यांचा जामीन अर्ज हायकोर्टासमोरील निवेदनासह मागे घेतला आहे. नितेश यांना चौकशीला सामोरे जायचे असल्याने सुप्रीम कोर्टाकडून आणखी 5 दिवसांचे संरक्षण शिल्लक असतानाही ते तपास अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण करत आहेत”, अशी प्रतिक्रिया वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग सेशन्स कोर्टाने कालच नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे सुनावणी संपल्यानंतर नितेश राणे कोर्टाबाहरे पडल्यानंतर जेव्हा गाडीत बसले तेव्हा पोलिसांनी त्यांच्या गाडीला अडवलं होतं. यावेळी मोठा हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला होता. पोलिसांनी अडवल्यानंतर नितेश राणे यांचे भाऊ माजी खासदार निलेश राणे पुढे आले होते. यावेळी निलेश राणे आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. नितेश राणे यांच्या जामीन अर्जाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे. त्यामुळे आम्हाला जाऊ द्या. कोर्टाची ऑर्डर द्या, असं निलेश राणे आक्रमकपणे पोलिसांना म्हणाले.
Read also:
- प्रभाग रचना : सत्ताधारी भाजपा किमान १० प्रभागांमध्ये हरकती नोंदवणार: विधानसभा प्रभारींची आक्रमक भूमिका
- खासदार संजय राऊतांना धक्का; जमीन घोटाळा प्रकरणात निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक
- मुंबईत पेगाससवरुन भाजप आणि काँग्रेस आमने सामने; आमदार लाड आणि पोलिसांत झटापट
- समीर वानखेडेंना महाविकास आघाडी सरकारचा दणका; बारचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द
- गॉडफादरच्या रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्यांना घरी पाठवा; रोहन खंवटे यांचे आवाहन