म्हापसा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सध्या गोव्यात सुरु असून सर्वच पक्ष आता कंबर कसून मैदानात उतरले आहेत. यातच म्हापसा मतदार संघातील लढत देखील रंगतदार बनली असून बहुरंगी लढतीमुळे सर्वांचेच लक्ष या मतदार संघाकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी आमदार जोशुआ डिसुझा यांना पुन्हा एकदा जनतेने निवडून द्यावे, असे आवाहन केले आहे.
ते म्हणाले, जोशुआ युवा आहे. आपल्या वडिलांप्रमाणे सर्वांना पुढे घेऊन जात आहे. दुसरे विरोधक उमेदवार आहेत ते स्वतःच्या पाठबळावर किती पुढे जाऊ शकतात? लोकांची कामे किती करू शकतात यावर विचार करावा. आज राजकारण असे झाले आहे की, आपल्या फायद्यासाठी काहीजण इतरत्र जातात. मात्र पुढील १० वर्षे भाजपची सत्ता राज्यात असेल, त्या सत्तेत वाटेकरी होण्यासाठी म्हापसा वासियांनी आमदार जोशुआ यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन रोहन खंवटे यांनी केले.
औरंगाबादेत ज्या दुकानात वाईन विक्री सुरु होईल ते दुकान मी फोडणार; इम्तियाज जलीलांचा इशारा
म्हापसा मतदारसंघाच्या वॉर्ड १८ मध्ये घरोघरी प्रचार संपल्यावर खंवटे बोलत होते. यावेळी आमदार जोशुआ डिसोझा माजी नगरसेवक रोहन कवळेकर, स्वप्नील शिरोडकर, योगेश खेडेकर, उपनगराध्यक्ष शेखर बेनकर, साईनाथ राऊळ आदी उपस्थित होते. युवा पिढीची आज गरज आहे. गॉडफादरच्या रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्यांना घरी पाठवा आणि तरुण तडफदार जोशुआ यांना निवडून द्या असं ते म्हणाले. फक्त जोशुआच नव्हे तर बार्देशातून सातापैकी सात उमेदवार भाजपचे निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत अन्य राज्यातून आलेल्या पक्षांना हाकलून लावा. असे ते म्हणाले.
जनतेसाठी आम्ही सदैव धडपडतोय : जोशुआ डिसोझा
जोशुआ डिसोझा म्हणाले, मायकल लोबो गेली सहा महिन्यापासून म्हापशात अतिरेक करीत आहे त्यांना करू द्या. लोकांना सर्वकाही माहीत आहे. सर्वांना रिंगणात राहण्याची इच्छा आहे त्यांनी राहावे. त्यांचे म्हापसा खोल रवाडा येथे बोलताना आमदार रोहन खंबटे, जोशुआ डिसोझा बाजूस उपनगराध्यक्ष शेखर बनेकर, स्वप्नील शिरोडकर, साईनाथ राऊळ, रोहन कवळेकर, योगेश खेडेकर स्वागत आहे. आम्ही जनतेसाठी सदैव धडपड करीत आहे. ही जागा भाजपसाठी गेली पाच वर्षे आहे. ती यंदाही भाजपकडेच राहील असे ते म्हणाले. येत्या वर्षभरात लोकांच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णत्वाकडे नेण्यात येईल असे श्री. जोशुआ म्हणाले. या निवडणुकीत भाजपचे २२ पेक्षा जास्त उमेदवार विजयी होणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
Read also:
- नितेश राणेंच्या पाठोपाठ आता निलेश राणेंवरही गुन्हा दाखल; राणेंच्या दोन्ही पुत्रांभोवती पोलिस कारवाईचा फास
- इंदापूर तालुक्यात दडपशाहीचं राजकारण खपवून घेणार नाही; अंकिता पाटलांचा दत्तात्रय भरणेंना इशारा
- राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा भाजप प्रवेश थांबवा आणि मग स्वप्न बघा; मुळीक यांचे जगतापांना खुले आव्हान
- २०२२चा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांची घोर निराशा करणारा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- भारताला आत्मनिर्भर अन् बलशाली बनविणारा अर्थसंकल्प – आमदार महेश लांडगे