पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना झालेली आहे. आगामी काळात कधीही निवडणूक जाहीर होऊ शकतात. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकारण चांगलंच तापलं आहे आणि फोडाफोडीच्या राजकारणाला देखील सुरुवात होऊ शकते.
नितेश राणेंना मोठा धक्का; स्वीय सहाय्यकाला ४ दिवसांची कोठडी, राणेंना जेल की बेल ?
प्रभाग प्रारूप रचना जाहीर होताच पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी लगेच एक बॉम्ब फोडला आहे. पुण्यात भाजपाचे १६ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असा खळबळजनक दावा पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. यामुळे राजकीय गोटातही खळबळ माजली आहे. प्रशांत जगतापांनी केलेल्या दाव्याला भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षांनी आव्हान दिले आहे. प्रशांत जगताप यांची एक जुनी सवय आहे आणि ती आहे आक्षेपार्ह विधाने करणे, चुकीची माहिती देणे. त्यातून ते अधून मधून प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात. पण, केवळ प्रसिद्धी मिळवून निवडणुका जिंकता येत नाहीत.
60 लाख नव्या नोकऱ्या, 400 वंदे भारत ट्रेन, ‘सेझ’चा कायदा बदलणार, शेती व्यवसयासाठी बजेटमध्ये काय?
प्रशांत जगतापांनी १६ नगरसेवकांच्या बाबतीत विधान केले आहे, मात्र त्यांचे ४०-४४ नगरसेवक जे भाजपात प्रवेश करणार आहेत त्यांचा प्रवेश त्यांनी रोखून दाखवावा आणि नंतर भाजपच्या नगरसेवकांबद्दल बोलावे असं खुलं आव्हान भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिलं आहे.
ओबीसी विधेयकावर राज्यपालांनी सही नाकारली; राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष टोकाला
ज्या पक्षाचे पुणे महानगरपालिकेत ४०-४४ नगरसेवक आहेत, त्या पक्षाने महापलिकेत १२२ नगरसेवक निवडून आणण्याचे स्वप्न पाहावे, हे हास्यास्पद आहे. मुळात त्यांची ताकद किती आहे, कुठल्या भागात आहे, हे त्यांनी अगोदर तपासावे आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी अशा वल्गना कराव्यात असा टोला देखील जगदीश मुळीक यांनी हाणला आहे.
Read also:
- २०२२चा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांची घोर निराशा करणारा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- भारताला आत्मनिर्भर अन् बलशाली बनविणारा अर्थसंकल्प – आमदार महेश लांडगे
- औरंगाबादेत ज्या दुकानात वाईन विक्री सुरु होईल ते दुकान मी फोडणार; इम्तियाज जलीलांचा इशारा
- राष्ट्रवादीचे नगरसेवक घाबरल्याने सोयीस्कर प्रभाग रचना? औंध, बाणेर, बालेवाडीतील सर्वपक्षीय इच्छुकांचा संताप
- शिवसेनेच्या एकेकाला ठोकून काढा; खासदार पूनम महाजन