सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर कोकणात राजकारण चांगलेच तापले होते. शिवसैनिक संतोष परब यांना निवडणुकीच्या काळात आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती असा आरोप संतोष परब आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आला होता.
शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांचं वादळी आंदोलन; पोलिसांचा आंदोलनकांवर लाठीचार्ज
त्यानंतर नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण निवडणूक होऊपर्यंत आमदार नितेश राणे हे अज्ञातवासात गेले होते. त्यानंतर शिवसेनेचा जिल्हा बँकेत पराभव झाला आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आली. जिल्हा बँकेत नारायण राणे यांनी मनीष दळवी यांची अध्यक्ष म्हणून निवड केली.
पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेची नावे जाहीर; कोणत्या भागाला काय नाव…. वाचा सविस्तर…
नितेश राणे यांचा जामीन न्यायालयाने मागील काळात फेटाळला होता आणि त्यांना १० दिवसात हजर राहण्याची मुदत दिली होती. गेल्या कित्येक दिवसांपासून अज्ञातवासात असणारे नितेश राणे हे १० दिवसांच्या आत कणकवली पोलिसांमध्ये चौकशीसाठी हजर राहिले. काल नितेश राणे यांचे पीए राकेश परब हे पोलिसांमध्ये हजर झाले होते. शिवसैनिक संतोष परब मारहाणीप्रकरणी राकेश परब यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज न्यायालयात शिवसैनिक संतोष परब मारहाणीप्रकरणी महत्वाची सुनावणी आहे. नितेश राणेंना जामीन मिळणार की, अटक होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेसाठी सज्ज राहावे – उदय सामंत
समोर आलेल्या माहितीनुसार आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कणकवली दिवाणी न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ फेब्रुवारी पर्यंतची न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे आज जिल्हा सत्र न्यायालयात आमदार नितेश राणे न्यायालयाला शरण गेल्यानंतर त्यांच्या जामीन अर्जावर देखील सुनावणी होणार आहे.
Read also:
- राष्ट्रवादीच्या प्रस्थापित- आत्मकेंद्री भूमिकेमुळे प्रभाग रचनेत भाजपाचा वरचष्मा !
- भाजपाचे आजी-माजी शहराध्यक्ष म्हणतात… प्रभाग रचना आमच्यासाठी अनुकूलच!
- म्हापश्यात तृणमूल समर्थकांना मारहाण; काँग्रेस समर्थकांकडून हल्ल्याचा आरोप
- ब्रेकिंग : १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाप्रकरणी तथाकथित हिंदुस्थानी भाऊला अटक
- नितेश राणेंची ‘त्या’ प्रकरणातून सुटका नाहीच; उद्या ३ वाजता अंतिम निर्णय होणार