सिंधुदुर्ग : शिवसेना कार्यकर्ता संतोष परब जीवघेणा हल्लाप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार अजूनही कायम आहे. आज सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली असून उद्या मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. तोपर्यंत नितेश राणेंना घरी जाण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.
भाजपच्या नेत्यांची मुले काय चणे-शेंगदाणे, ढोकळा विकतात का? संजय राऊतांचा सवाल
नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्यामुळे अखेर नितेश राणे यांना पुन्हा एकदा जामीन मिळवण्यासाठी कणकवली कोर्टामध्ये अर्ज दाखल करावा लागला. आज पुन्हा एकदा नितेश राणे यांच्या वकील संग्राम देसाई आणि सरकारी वकील प्रदीप घरत यांच्यात जोरदार युक्तीवाद झाला.
नितेश राणेंचे स्वीय सहाय्य्क राकेश परब पोलीस ठाण्यात हजर; राणेंना जेल की बेल?
संग्राम देसाई यांनी पोलिसांनी तपासात काही मुद्दे उपस्थित केले. पोलीस बोलतायेत की नितेश राणे यांच्याकडे ७ मोबाईल नंबर आहेत पण फक्त ३ मोबाईल नंबर पोलिसांनी तपास अहवालात दिले. त्यातील एक नंबर ज्याचा नितेश राणे वापर केला असं पोलीस बोलत आहे. तो नितेश राणे यांनी ७ वर्षांपूर्वीच वापरायचे बंद केले. तो कोणाला तरी तिऱ्हाईत व्यक्तीला वोडाफोन कंपनीने दिला आहे त्याचा अहवाल कोर्टात सादर करतो. मोबाईल फोन नितेश राणे स्वतः डिसेंबर महिन्यात घेवून गेले होते, अशी माहिती देसाईंनी न्यायालयात दिली.
म्हापश्यातील कुठलाही वार्ड विकास कामांपासून वंचित राहिला आहे, असे कुणीही म्हणू शकत नाही – वायंगणकर
तसंच, ‘राणेंवर ३५३ च्या तीन केसेस आहेत. मालवण बांगडा फेक आंदोलन, इंजिनिअरच्या चेहऱ्याला काळे फासणे आणि डंपर आंदोलन या व्यतिरिक्त कोणतेही गुन्हे नाहीत, हे सर्व जनतेसाठी आंदोलन करताना झालेले गुन्हे आहेत, असा युक्तीवाद देसाई यांनी केला. माझ्याकडे व्हॅन नाही. ज्या व्हॅन मध्ये कट रचला असं पोलिस तपासात बोललं जातय ती व्हॅन माझी नाही. माझ्याकडे कोणतेही शस्र नाही. माझे मोबाईल मी पोलिसांना दाखवले होते त्यामुळे माझ्या कोठडीची गरज नाही, असं राणेंच्या वतीने देसाई यांनी कोर्टात सांगितले.
Read also:
- विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेसाठी सज्ज राहावे – उदय सामंत
- पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेची नावे जाहीर; कोणत्या भागाला काय नाव…. वाचा सविस्तर…
- शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांचं वादळी आंदोलन; पोलिसांचा आंदोलनकांवर लाठीचार्ज
- खुलेआम वाईन विक्रीतून सरकार नेमकं काय साध्य करणार? अण्णा हजारेंचा सवाल
- “संजय” ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का? मनसेची राऊतांवर खोचक टीका