सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर कोकणात राजकारण चांगलेच तापले होते. शिवसैनिक संतोष परब यांना निवडणुकीच्या काळात आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती असा आरोप संतोष परब आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आला होता.
शास्तीकराचा गुंता राष्ट्रवादीने वाढवाला अन् पिंपरी-चिंचवडकरांच्या जखमेवर आता मीठ चोळले?
त्यानंतर नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण निवडणूक होऊपर्यंत आमदार नितेश राणे हे अज्ञातवासात गेले होते. त्यानंतर शिवसेनेचा जिल्हा बँकेत पराभव झाला आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आली. जिल्हा बँकेत नारायण राणे यांनी मनीष दळवी यांची अध्यक्ष म्हणून निवड केली. नितेश राणे यांचा जमीन अर्ज मागील आठवड्यात फेटाळण्यात आला होता आणि त्यांना न्यायालायने १० दिवसांत हजर होण्याचे आदेश दिले होते. आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार नितेश राणे यांचे स्वीय सहायक कणकवली पोलिसांसमोर शरण आले आहेत.
राज्यातील विरोधी पक्ष देशी पिउन बरळतोय; वाईन विक्री निर्णयावरून संजय राऊतांची भाजपवर टीका
नितेश राणेंचे स्वीय सहाय्यक राकेश परब हे आज सकाळी कणकवली पोलिसांसमोर शरण आले.शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात राकेश परब हे आरोपी आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सचिन सातपुते याला पोलिसांनी आधीच अटक केली आहे. सचिन सातपुते यानेच शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला केला होता. याच सचिन सातपुतेच्या संपर्कात आमदार नितेश राणे हे सातत्याने होते, असा पोलिसांचा आरोप आहे. राणे हे स्वीय सहाय्यक राकेश परब यांच्याच माध्यमातून सातपुतेशी संपर्क साधत होते, असाही पोलिसांनि दावा केला आहे. आता राकेश परब हे पोलिसांसमोर हजर झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
Read also:
- भाजपच्या नेत्यांची मुले काय चणे-शेंगदाणे, ढोकळा विकतात का? संजय राऊतांचा सवाल
- …तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गांज्या निर्मितीची परवानगी द्या – खासदार प्रताप चिखलीकर
- निवडणूक लढविण्यासाठी बायको पाहिजे; जातीची अट नाही
- गोव्यात फडणवीस-लांडगेंचा धडाका; म्हापश्यातील शक्ती केंद्रांच्या बैठकांवर जोर
- आमदारांचे असंवैधानिक निलंबन: सर्वोच्च न्यायालयाची महाविकास आघाडी सरकारला चपराक!